नियमित शाळेत प्रवेश न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या पाचवी व इयत्ता आठवी मध्ये नव्याने प्रवेश घेण्याची संधी!
जे विद्यार्थी नियमित शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन झालेली आहे.
मंडळाच्या दिनांक सात नोव्हेंबर 2022 च्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन नाव नोंदणी प्रवेश प्रक्रिये बाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
नाव नोंदणीसाठी संकेतस्थळ.
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी साठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकरता ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी प्रवेश खर्च स्वीकारण्याचा कालावधी या अगोदर दिनांक 17 ऑक्टोबर 2022 ते दिनांक 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत निश्चित केला होता परंतु सदर कालावधी वाढवून पुढील प्रमाणे मुदत वाढ देण्यात आली आहे.
मंगळवार दिनांक 8 नोव्हेंबर 2022 ते सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर 2022 रात्री अकरा वाजून 59 मिनिटांपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नाव नोंदणी अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे.
गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 2022 ते बुधवार दिनांक 23 नोव्हेंबर 2022 पर्यंत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करणे साठी कालावधी उपलब्ध करून दिला आहे.
शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थी अर्ज विहित शुल्क मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करण्यासाठी कलावधी उपलब्ध करून दिला आहे. तरी उपरोक्त कालावधीमध्ये आपल्या विभागीय मंडळाच्या अधिनिस्त संबंधित संपर्क केंद्र शाळा प्रमुख किंवा मुख्याध्यापक यांना सूचना देण्यात याव्या तसेच कारागृह व बाल सुधार गृह मधील कैद्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरता नाव नोंदणी सभापती शौकत करावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास त्वरित सादर करावा असे निर्देश दिले आहेत.
वरील महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments