जिल्हा परिषद शिक्षकांची नियुक्ती केवळ अध्यापन व शैक्षणिक कामांसाठी करणेबाबत शासन निर्णय.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 20 सप्टेंबर 2019 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार जिल्हा परिषद शिक्षकांची नियुक्ती केवळ अध्यापन व शैक्षणिक कामांसाठी करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषदेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याच्या कामासाठी नियुक्त केलेले आहे या संदर्भात यापूर्वी शासन निर्णय निर्गमित करून आवश्यकता सूचना शासन स्तरावरून देण्यात आल्या आहेत.
मात्र शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की अद्यापही जिल्हा परिषद तसेच गटविकास अधिकाऱ्यांच्या स्तरावर जिल्हा परिषदेतील शिक्षकांना विशिष्ट कामगिरीवर नेमून जिल्हा परिषद कार्यालयात व गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अनधिकृत पणे नियुक्त केलेले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. मुळातच राज्यात जिल्हा परिषद शिक्षकांची पुरेशी संख्या दिसून येत नाही. विद्यार्थ्यांच्या संख्येनिहाय व त्या त्या शाळेसाठी शिक्षक दिला जातो सर्व जिल्हा परिषदांमध्ये थोड्याफार प्रमाणात शिक्षकांची कमतरता आहे असे असताना जिल्हा परिषद व गटविकास अधिकाऱ्यांच्या स्तरावर शिक्षकांकडे विद्यार्थ्यांच्या शिकवण्याच्या कामाव्यतिरिक्त अन्य कामे सुपूर्द करणे गंभीर बाब आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासनाने दिलेल्या प्रतिनियुक्तीच्या आदेशाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी अशा पद्धतीने शिक्षक कामगिरीवर ठेवणे उचित नाही संबंधित अधिकाऱ्यांच्या अशा कृतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी हे या कृतीस जबाबदार ठरतात.
सबब आपल्या जिल्हा परिषदांमध्ये व गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जिल्हा परिषद शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या व्यतिरिक्त अन्य कामास नेमलेले असल्यास त्यांना तात्काळ त्यांच्या शाळेत परत पाठवावे. वरील प्रमाणे कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकारी शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र राहील याची नोंद घ्यावी असे निर्देश ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना दिले आहे.
वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments