बदली अपडेट - आज दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याबाबत निर्गमित केलेले सुधारित वेळापत्रक.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी सन 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांबाबत वेळापत्रक पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करून जाहीर केले आहे.
सदर शासन निर्णयानुसार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रिक्त पदांची यादी अद्यावत करावयाची आहे.
तर दिनांक 8 नोव्हेंबर 2022 ते 21 नोव्हेंबर 2022 या कालावधीत विशेष संवर्ग भाग एक आणि विशेष संवर्ग भाग दोन चे अर्ज भरणे आहे.
तर दिनांक 22 नोव्हेंबर 2022 ते 24 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी हे विशेष संवर्ग भाग एक आणि विशेष संवर्ग भाग दोन चे भरलेले अर्ज रद्द करू शकतील.
दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी शिक्षणाधिकारी हे बदली पात्र आणि बदली अधिकार प्राप्त यांच्या याद्या पुन्हा जाहीर करतील आणि विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन यांच्या याद्या जाहीर करतील.
ज्या शिक्षकांचे अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिन मधून रद्द केले आहेत त्यांना शिक्षण अधिकाऱ्याकडे दिनांक 26 नोव्हेंबर 2022 ते 28 नोव्हेंबर 2022 पर्यंत अपील करण्यासाठी मुदत राहील.
दिनांक 29 नोव्हेंबर 2022 ते दिनांक 2 डिसेंबर 2022 पर्यंत संवर्ग दोन व संवर्ग एक मधील शिक्षकांनी केलेली अपील मंजूर करणे अथवा नाकारण्यासाठी शिक्षण अधिकारी यांच्यासाठी कालावधी असेल.
शिक्षणाधिकारी यांनी अपील नकारल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे संवर्ग एक व संवर्ग दोन चे शिक्षक अपील करू शकणार आहेत त्यासाठी दिनांक 3 डिसेंबर 2022 ते 5 डिसेंबर 2022 ही मुदत असेल.
शिक्षकांनी दिलेल्या अपीलावर निर्णय घेण्यासाठी दिनांक ६ डिसेंबर 2022 ते 8 डिसेंबर 2022 पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वेळ असेल.
दिनांक 9 डिसेंबर 2022 रोजी शिक्षणाधिकारी बदली पात्र बदली अधिकार प्राप्त व विशेष संवर्ग भाग एक व भाग दोन यांच्या याद्या पुन्हा जाहीर करतील.
विशेष संवर्ग भाग एक बदली प्रक्रिया प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक 14 डिसेंबर 2022 ते 17 डिसेंबर 2022 पर्यंत शिक्षकांना वेळ असेल.
सर दिनांक 14 डिसेंबर 2022 ते 17 डिसेंबर 2022 पर्यंत सॉफ्टवेअर विशेष संवर्ग भाग एक ची बदली प्रक्रिया राबवेल.
दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी हे रिक्त पदांच्या याद्या प्रकाशित करतील.
दिनांक 20 डिसेंबर 2022 ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये विशेष संवर्ग भाग दोन मध्ये मोडत असलेले शिक्षक आपला प्राधान्यक्रम भरतील.
तर दिनांक 24 डिसेंबर 2022 ते 27 डिसेंबर 2022 या कालावधीत सॉफ्टवेअर विशेष संवर्ग भाग दोन ची बदली प्रक्रिया चालवेल.
28 डिसेंबर 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पुन्हा रिक्त पदांची यादी जाहीर करतील.
दिनांक 29 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 या कालावधीत बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजेच संवर्ग तीन मधील शिक्षक आपले प्राधान्यक्रम भरतील.
दिनांक 3 जानेवारी 2023 ते 5 जानेवारी 2023 या कालावधीत बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली प्रक्रिया सॉफ्टवेअर चालवेल.
सहा जानेवारी 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पुन्हा रिक्त पदांची यादी प्रकाशित करतील.
दिनांक सात जानेवारी 2023 ते 10 जानेवारी 2023 या कालावधीत बदली प्राप्त शिक्षक आपला प्राधान्यक्रम भरतील.
दिनांक 11 जानेवारी 2023 ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत बदली पात्र शिक्षकांची बदली प्रक्रिया चालवण्यासाठी सॉफ्टवेअरला वेळ असेल.
दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पुन्हा रिक्त पदांची यादी प्रकाशित करतील.
वरील बदली प्रक्रियेत जे शिक्षक विस्थापित होतील अशा विस्थापित शिक्षकांना दिनांक 17 जानेवारी 2023 ते 20 जानेवारी 2023 या कालावधीत पर्याय निवडण्यासाठी संधी असेल.
दिनांक 21 जानेवारी 2023 ते 24 जानेवारी 2023 या कालावधीत विस्थापित शिक्षकांचा राऊंड मध्ये विस्थापित शिक्षकांसाठी बदली प्रक्रिया सॉफ्टवेअर राबवेल.
दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पुन्हा रिक्त पदांची यादी जाहीर करतील.
ज्या शिक्षकांनी दहा वर्षे सुगम क्षेत्रात काम केलेले आहे अशा बदली पात्र शिक्षकांची यादी दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाशित करतील.
अवघड क्षेत्रात राहिलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी राऊंड 28 जानेवारी 2023 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीसाठी शिक्षकांसाठी उपलब्ध असेल.
अवघड क्षेत्रात राहिलेल्या जागा भरण्यासाठी दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 4 फेब्रुवारी 2023 या कालावधीत सॉफ्टवेअर बदली प्रक्रिया राबवेल.
व बदलीचा अंतिम टप्पा म्हणजे दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी हे बदली आदेश प्रकाशित करतील.
वरील ग्रामविकास विभागाचा बदली संदर्भातील शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments