पोर्टलवर किंवा यादीत Eligible लिहून न आल्याने संवर्ग एक व दोन ला फॉर्म भरता येणार की नाही?

पोर्टलवर किंवा यादीत Eligible लिहून न आल्याने संवर्ग एक व दोन ला फॉर्म भरता येणार की नाही? 


शिक्षक संवर्ग एक असो वा दोन, सध्याच्या शाळेत 5 वर्ष झाल्याशिवाय तसेच सर्वसाधारण किंवा अवघड क्षेत्रात 10 वर्ष झाल्याशिवाय पोर्टल अथवा यादी मध्ये Eligible शब्द लिहून येणार नाही.

   Eligible लिहून न आल्याने संवर्ग एक व दोन ला फॉर्म भरता येणार नाही असा गैरसमज करू नये. संवर्ग 1 व 2 ला  या बदल्यांमध्ये सेवा कालावधीचे बंधन (एकूण सेवा दहा वर्ष व एका शाळेतील सेवा पाच वर्ष) नसल्याने फॉर्म भरता येणार आहे. (एका शाळेवर विनंती बदलीसाठी तीन वर्ष सेवा आवश्यक आहे) 


 संवर्ग 1 मधील शिक्षकांना पसंतीनुसार गाव नाही मिळाले तर? संवर्ग दोन मधील दोघांपैकी कोणी बदली अर्ज करावा? 



जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू झाली असून उद्यापासून संवर्ग एक व संवर्ग दोन मधील शिक्षकांना बदली हवी किंवा नको याबाबत पोर्टलवर नोंद करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.


संवर्ग एक मधील शिक्षकांचे बदल्यांसाठी प्राधान्य क्रमानुसार यादी तयार करण्यात येणार आहे या यादीच्या आधारे बदली करताना शिक्षकांचा पसंतीक्रम विचारात घेऊन ज्या शाळांमध्ये बदलीपात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल जर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्याच्या पसंतीप्रमाणे एकही शाळेमध्ये बदली देता आली नाही तर त्याची बदली होणार नाही.

एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्याच्या सेवाजेष्ठता विचारात घेऊन ज्येष्ठ कर्मचाऱ्यास प्रथमता बदली अनुज्ञेय राहील.

वरील प्रमाणे संवर्ग एक साठी सुस्पष्ट अशी सूचना दिनांक सात एप्रिल 2021 च्या सुधारित जिल्हा अंतर्गत बदली धोरणात आहे. मुद्दा क्रमांक 4.2.6.




जे शिक्षक विशेष संवर्ग भाग दोन मध्ये मोडतात त्यांनी विवरणपत्र क्रमांक चार मधील नमुन्यात स्वयंघोषित प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे.

जर दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करू शकेल.

उपरोक्त प्रमाणे पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी शासन निर्णयातील नमूद केलेल्या कार्यपद्धती लागू होतील. या तरतुदी प्रमाणे संबंधिताची बदली पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक एकक वन युनिट म्हणून बदलीने नियुक्ती देता येईल पर्याय आणि ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा 30 किलोमीटर परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल. जर दोघी पती-पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यावयाचे आहे यापैकी एकाची पण सेवा दहा वर्ष सलग सेवा झाली असल्यास दोघांना बदली पात्र धरण्यात येईल.

विशेष संवर्ग दोन च्या खाली बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.



संपूर्ण जिल्हाअंतर्गत बदली सुधारित धोरण शासन आदेश दिनांक 7 एप्रिल 2021 पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा. व आपणास बदली संदर्भात असलेल्या शंका दूर करा.

Download



बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.