जिल्हा अंतर्गत बदली महत्त्वाचे - विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 व भाग 2 बदली करिता आवश्यक पुरावे यादी.
जिल्हाअंतर्गत शिक्षक संवर्ग बदली 2022 मध्ये दिनांक 7 एप्रिल 2021 च्या सुधारित धोरण शासन निर्णयानुसार शिक्षकांच्या विशेष संवर्ग भाग एक किंवा भाग दोन मधून बदली हवी असल्यास गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांचे त्रिस्तरीय समितीसमोर आपण संवर्ग एक किंवा संवर्ग दोन मध्ये मोडत असल्या चा सक्षम पुरावा सादर करायचा आहे.
विशेष संवर्ग शिक्षक भाग एक व भाग दोन मधील प्राधान्यक्रमानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची यादी आपणासाठी उपलब्ध करून दिली जात आहे.
विशेष संवर्ग शिक्षक भाग एक बदली करिता आवश्यक पुरावे.
1) पक्षाघाताने आजारी शिक्षक Paralysis - जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र.
2) दिव्यांग शिक्षक सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक 14 जानेवारी 2011 मधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम प्राधिकार्याचे प्रमाणपत्र आवश्यक मानसिक विकलांग मुलाचे पालक म्हणजेच आई वडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक - ऑनलाइन अपंग प्रमाणपत्र तथा मतिमंद व अपंग मुलांचे पालक असल्यास पाल्य अठरा वर्षापेक्षा अधिक असल्यास न्यास अधिनियम 1999 अन्वय सक्षम प्राधिकारी यांचे कडील पालकत्वाचा दाखला.
3) हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी - जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र.
4) जन्मापासून एकच मूत्रपिंड किडनी असलेले किंवा मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक/डायलिसिस सुरू असलेले शिक्षक - जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र.
5) यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक - जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र.
6) कॅन्सर म्हणजेच कर्करोगाने आजारी शिक्षक - जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र.
7) मेंदूचा आजार झालेले शिक्षक - जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र.
8) थॅलेसेमिया स्वीकार ग्रस्त मुलांचे पालक जन्मजात गुणसूत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार(Methyl Malonic Acidemia (MMA) Classic Type (Mutase Defiency) - जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कडील प्रमाणपत्र.
9) आजी-माजी सैनिक व अर्ध सैनिक जवानांच्या पत्नी अथवा विधवा - सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र.
10) विधवा शिक्षक - पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र.
11) कुमारीका शिक्षिका - स्वयंघोषणापत्र.
12) परित्यक्ता/घटस्फोटीत महिला कर्मचारी - घटस्फोटाबाबत न्यायालयीन निर्णयाची प्रत.
13) वयाची 53 वर्षे पूर्ण झालेली शिक्षक - सेवा पुस्तकाचे पहिल्या पानाची झेरॉक्स.
14) स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा मुलगी नातू नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत) - सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र
खालील आजाराने ज्या शिक्षकांची जोडीदार व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षक.
15) हृदय शस्त्रक्रिया झालेले - जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र.
16) जन्मापासून एकच मूत्रपिंड किडनी असलेले मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी/डायलिसिस सुरू असलेले - जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र जोडीदार असल्याचा पुरावा.
17) यकृत प्रत्यारोपण झालेले - जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र व जोडीदार असल्याचा पुरावा.
18) कॅन्सर म्हणजेच कर्करोगाने आजारी असलेले - जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र व जोडीदार असल्याचा पुरावा.
19) मेंदूचा आजार झालेले - जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र व जोडीदार असल्याचा पुरावा.
20) थॅलेसेमिया विकारगस्त असलेले - जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील प्रमाणपत्र व जोडीदार असल्याचा पुरावा.
विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन बदली करिता आवश्यक पुरावे.
विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन म्हणजेच पती-पत्नी एकत्रीकरण यामध्ये जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून 30 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.
1) पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर - कार्यरत कार्यालय प्रमुख यांचे प्रमाणपत्र.
2) पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर - कार्यालय प्रमुख यांचे प्रमाणपत्र.
3) पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर - कार्यालय प्रमुख यांचे प्रमाणपत्र.
4) पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर उदाहरणार्थ महानगरपालिका नगरपालिका - कार्यालय प्रमुख यांचे प्रमाणपत्र.
5) पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी असेल तर - नियुक्ती प्राधिकारी यांचे आदेशाची प्रत/दाखला.
6) पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक अथवा कर्मचारी असेल तर - सक्षम प्राधिकारी यांचे वैयक्तिक मान्यता प्रत (अप्रुव्हल APPROVAL)
शासन निर्णय दिनांक 7 एप्रिल 2021 मधील मुद्दा क्रमांक 4.3.5 मध्ये नमूद केले नुसार संवर्ग दोन पती-पत्नी एकत्रीकरणासाठी 30 किलोमीटर रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम हे सक्षम प्राधिकारी राहतील.
शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर यांचे विशेष संवर्ग शिक्षक भाग एक व भाग दोन यांच्यासाठी आवश्यक पुरावे व कागदपत्रे याविषयी आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments