विशेष संवर्ग भाग एक व भाग दोन यांच्या याद्या उद्या जाहीर होणार - जिल्हाअंतर्गत बदली 2022 नवीन वेळापत्रक ग्रामविकास विभाग.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 28 नंबर 2022 रोजी सन 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांबाबत पुन्हा एकदा सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे ते पुढील प्रमाणे.
या अगोदरच्या वेळापत्रकानुसार 26 नोव्हेंबर 2022 रोजी बदली पात्र बदली अधिकार प्राप्त यांच्या पुन्हा याद्या जाहीर करणे आणि विशेष संवर्ग भाग एक व भाग दोन यांच्या जाहीर करणे बाबत सूचित करण्यात आले होते. परंतु संवर्ग एक व संवर्ग दोन मधील शिक्षकांचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी जास्त वेळ लागल्यामुळे त्यासाठी दिनांक 28 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती त्यामुळे आता..
बदली पात्र आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या पुन्हा जाहीर करणे आणि विशेष संवर्ग भाग एक व भाग दोन यांच्या याद्या दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे.
सदर याद्या जाहीर झाल्यानंतर सदर याद्यांवरील शिक्षणाधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवण्यासाठी दिनांक 30 नोव्हेंबर 2022 ते 3 डिसेंबर 2022 पर्यंत शिक्षकांना आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे.
तर सदर आक्षेप मंजूर करणे किंवा नाकारणे यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना दिनांक 5 डिसेंबर २०२२ ते दिनांक दहा डिसेंबर 2022 पर्यंत वेळ देण्यात आलेला आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांच्या निर्णयांवर जर शिक्षकांचा पुन्हा आक्षेप असेल तर दिनांक 11 डिसेंबर 2022 ते 13 डिसेंबर 2022 या कालावधीत शिक्षक सदर याद्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील करू शकणार आहेत.
तर शिक्षकांनी केलेल्या अपीलावर मुख्य कार्यकारी अधिकारी दिनांक 14 डिसेंबर 2022 ते 17 डिसेंबर 2022 या कालावधीत निर्णय घेतील.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर अपीलांवर निर्णय घेतल्यानंतर दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी शिक्षणाधिकारी पुन्हा बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त विशेष संवर्ग भाग एक विशेष संवर्ग भाग दोन यांच्या याद्या जाहीर करतील.
व त्यानंतर विशेष संवर्ग भाग एक साठी प्राधान्यक्रम भरून देण्यासाठी दिनांक 20 डिसेंबर 2022 ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीत शिक्षकांना पोर्टल उपलब्ध होईल.
अर्थात वरील सर्व गोष्टी वेळेत पार पाडल्यास यापुढील वेळापत्रकाचे पालन होऊ शकेल किंवा पुन्हा आजच्याप्रमाणे नवीन सुधारित वेळापत्रक आपल्यापर्यंत पोहोचेल.
जिल्हा अंतर्गत बदली बाबत आज दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी चे ग्रामविकास विभागाचे परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments