जिल्हांतर्गत बदली अपडेट - शिक्षकांसाठी बदली पोर्टलवर या दिवशी होणार ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध.
जिल्हाअंतर्गत बदलीसाठी विन्सेस प्रायव्हेट लिमिटेड ने तयार केलेल्या पोर्टलवर लॉगिन करायला गेल्यास आपल्याला पोर्टल ओपन केल्यानंतर पुढील प्रमाणे स्क्रीन दिसून येते..
यामध्ये वर लिहिलेला मेसेज देखील आता बदललेला आहे सदर मेसेज नुसार "आज दिनांक 21 ऑक्टोबर 2022 पासून जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेची सुरुवात" असे मराठीतून तर "Intra District Transfer Starts from Today 21/10/2022." असा इंग्रजीतून संदेश आपल्याला लाल बॅकग्राऊंड मध्ये दिसून येतो.
वरील बदली पोर्टलच्या दोन्ही संदेशाचा अर्थ लावायला गेल्यास किंवा संबंध शोधायला गेल्यास.
आता बदली पोर्टलवर लॉगिन करायला गेल्यास 21 ऑक्टोबर पासून जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेला सुरुवात ऐवजी एक एकतर 31 ऑक्टोबर पासून बदली प्रक्रिया सुरुवात असा मेसेज असायला हवा होता.
अन्यथा 21 नोव्हेंबर 2022 पासून शिक्षकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल असा मेसेज असायला हवा होता.
वरील मेसेज चुकून तसा लिहिला गेला असावा.
म्हणजेच या आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी प्राथमिक व गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन वरील काम पूर्ण होऊन दिनांक 21 नोव्हेंबर 2022 पासून बदली पोर्टलवर होकार किंवा नकार दर्शवणे व त्यासोबतच बदली अर्ज भरणे आपल्या पसंतीच्या 30 शाळा निवडणे यासाठी बदली पोर्टल सुरू होईल अशी शक्यता आहे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments