रक्ताच्या नात्यातील जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्यास इतर पुराव्यांची मागणी न करता जातीचे प्रमाणपत्र देणेबाबत अधिसूचना.
महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 24 नोव्हेंबर 2017 रोजी निर्गमित केलेल्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याचे पडताळणीची विनियमन अधिनियम 2000 यामध्ये पुढील प्रमाणे सुधारणा केली आहे.
पडताळणी समितीने दिलेले अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्या तर त्यांचे किंवा वडिलांकडे रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे उपलब्ध असल्यास वैधता ्रमाणपत्र दाखल केले असल्यास सदर वैदता प्रमाणपत्र महत्त्वाचा पुरावा म्हणून इतर पुराव्याची मागणी न करता सक्षम प्राधिकार्याने जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करावे.
जर अर्जदाराने पडताळणी समितीने निर्गमित केलेले अर्जदाराच्या रक्त संबंधातील वडिलांचे किंवा सख्या चिंत्याचे किंवा वडिलांकडे रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे वैधता प्रमाणपत्र सादर केल्यास सक्षम प्राधिकार्यांनी इतर कागदपत्रांची किंवा पुराव्यांची मागणी न करता संबंधित अर्जदाराने सादर केलेला वैधता प्रमाणपत्र महत्त्वाचा पुरावा मानून जात प्रमाणपत्र निर्गमित करावे.
वरील प्रमाणे बदल करून सक्षम प्राधिकार्यास जात प्रमाणपत्र निर्गमित करणे बाबत सूचना सदर अधिसूचनेनुसार देण्यात आल्या आहेत.
वरील संपूर्ण अधिसूचना पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments