आज 14 एप्रिल रोजी अद्याप रोस्टर पब्लिश झाले नाही.
सर्व जिल्हा परिषद यांना दिनांक 12 एप्रिल 2025 पर्यंत बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर अपलोड करण्यासाठी मुदतवाढ!
13 एप्रिल 2025 रोजी होणार रोस्टर पब्लिश..
तर 14 एप्रिल 2025 रोजी राज्यातील शिक्षकांना रोज तर पाहण्यासाठी उपलब्ध होणार..
बदली पोर्टलवर आजचे.नवीन वेळापत्रक पुढीलप्रमाणे
सकाळची स्थिती👇
आज दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी बदली पोर्टल वर लॉगिन केल्यास रोस्टर पब्लिश ही ॲक्शन पूर्ण झाल्याची दिसते. रोस्टर पाहण्यासाठी ची कृती देखील पूर्ण झाल्याची दिसते.
परंतु या पुढील वेळापत्रक पोर्टलवर अद्याप दिलेले नाही.
परंतु जेव्हा आपण रोस्टर टॅब वर क्लिक करून मिडीयम निवडतो तेव्हा मात्र आपल्याला रोस्टर नॉट पब्लिश असा मेसेज दिसतो.
अर्थात दिनांकानुसार जरी डॅशबोर्डवर सर्व कृती पूर्ण झालेल्या दिसतात मात्र त्या अद्याप पूर्ण झालेल्या नाही.
त्यामुळे रोस्टर पब्लिश होण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
आज दिनांक सहा एप्रिल 2025 रोजी जर सर्व जिल्हा परिषदेचे अपलोड होऊन पब्लिक झाले तर ते उद्या आपल्याला पाहायला मिळू शकतात.
परंतु आज रविवार असल्यामुळे तसे होण्याची शक्यता कमी आहे.
म्हणजेच सर्व जिल्हा परिषदांना बिंदू नामावली पब्लिश करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
जोपर्यंत सर्व जिल्ह्यांचे रोस्टर बदली पोर्टलवर पब्लिश होत नाही तोपर्यंत अंतर जिल्हा बदली साठी शिक्षकांना अर्ज करण्यास सुरुवात होणार नाही.
जर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया लांबली तर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया देखील लांबणीवर पडू शकते.
जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया ही आंतरजिल्हा बदली प्रक्रियेनंतर सुरू होईल.
अर्थात वरील सर्व बदली पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून दिलेला अंदाज आहे. सर्व गोष्टी अशाच होतील हे निश्चित नाही!
अधिकृत पत्र किंवा माहिती मिळाल्यास आपणास लगेच कळवण्यात येईल त्यासाठी नियमित भेट द्या pradipjadhao.com या आमच्या संकेतस्थळाला!
जिल्हा परिषद शिक्षक ऑनलाईन बदली अपडेट 2025.
शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टलवर दुसरा टप्पा आंतर जिल्हा बदली सुरू करण्यात आला आहे. जिल्हा परिषदांना बिंदू नामावली अद्यावत करून ती अपलोड करण्यासाठी दिनांक 29 मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती ती आता वाढवून दिनांक 3 मार्च पर्यंत आता जिल्हा परिषदा बिंदू नमावली म्हणजेच रोस्टर अपलोड करू शकणार आहे.
तर रोस्टर प्रसिद्ध करण्यासाठी चार मार्च 2025 ची मुदत वाढवून देण्यात आली आहे.
आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षक बांधव हे त्या त्या जिल्हा परिषदांचे रोस्टर म्हणजेच बिंदुमनामावली दिनांक पाच मार्च २०२५ रोजी पाहू शकणार आहे.
अर्थात वरील प्रक्रिया दिलेल्या वेळेत पूर्ण झाली तरच पुढील टप्पा म्हणजेच आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षक बांधवांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
वरील प्रक्रिया वेळेत न झाल्यास पुन्हा मुदतवाढ मिळू शकते.
जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रियेसाठी पोर्टलवर लॉगिन कसे करावे.
आपल्या मोबाईल मधून गुगल एप्लीकेशन ओपन करून गुगल वर, TTMS किंवा Ott mhardd असे सर्च करा. व आलेल्या पहिल्याच सजेशन वर क्लिक करून बदली पोर्टल वर जा.
आपण बदली प्रक्रियेसाठी आवश्यक पुढील प्रक्रिया करा.
ववरील स्क्रीन शॉट मधील डाव्या बाजूच्या पांढऱ्या रंगाच्या आडव्या तीन रेषांवर क्लिक केल्यास पोर्टल वरील सर्व मेनू ओपन होतात.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments