29-11-2022 रोजी पोर्टलवर प्रसिद्ध याद्यांवर अपील करायचे म्हणजे नेमके काय करायचे ?
1) सर्वप्रथम सर्व याद्यांचे अवलोकन करावे.
2) आपण संवर्ग एक व बदलीपात्र आहात परंतु बदलीस नकार दिला आहे तर आपले नाव बदलीपात्र यादीत राहणार नाही.
3) आपल्याला क्षेत्रनिहाय 10 वर्ष व सध्या कार्यरत शाळेत पाच वर्ष झाले आहे परंतु आपले नाव बदली पात्र यादीत नाही. नाव समाविष्ठ करण्यास Apeal to EO करावे.
4) आपल्याला क्षेत्रनिहाय 10 वर्ष झाले नाही व सध्याच्या शाळेत 5 वर्ष झाले आहेत व बदली पात्र यादीत सुद्धा नाव आहे. करिता नाव वगळण्यास Apeal to EO करावे.
5) प्रोफाइल ला Email ID चुकीचा आहे तर Apeal to EO करावे.
6) इतर काही तांत्रिक अडचण असल्यास Apeal to EO करावे.
7) कागदावर प्रति, शिक्षणाधिकारी लिहून आपले म्हणणे सविस्तर लिहावे. यापूर्वी आपण तक्रारींबद्दल अर्ज केला असल्यास त्याचा विषयाच्या खाली संदर्भ नमूद करावा.
8) लिहिलेल्या अर्जाची pdf तयार करावी. खालील बदली पोर्टल link टॅप करून अथवा लॅपटॉप वर ott link टॅप करून लॉगिन करून List Tab मध्ये आलेल्या Apeal to EO या TAB वरून अपील करावी. Submit करून otp नमूद करावा. आलेल्या मेलची प्रिंट काढून ठेवावी.
अपील करण्याबाबत video बघावा
बदली पोर्टलवर अपील किंवा आक्षेप कसा घ्यावा.
बदली पोर्टल लिंक
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments