"विद्यार्थी विज्ञान मंथन" परीक्षा इयत्ता सहावी ते अकरावी मध्ये विद्यार्थ्यांसाठी - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संचालकांचे पत्र

"विद्यार्थी विज्ञान मंथन" परीक्षा इयत्ता सहावी ते अकरावी मध्ये विद्यार्थ्यांसाठी - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संचालकांचे पत्र.


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक माननीय कृष्णकुमार पाटील यांनी दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी विद्यार्थी विज्ञान मंथन नवभारत निर्मितीसाठी इयत्ता सहावी ते अकरावी मधील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी सर्वात मोठी विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा याबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.

विज्ञान भारती, विज्ञान प्रसार आणि एनसीईआरटीएन च्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विज्ञान मंथन ही परीक्षा दरवर्षी इयत्ता सहावी ते अकरावी मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा निरीक्षण आणि तर्काच्या आधारावर विश्लेषण करण्याची क्षमता वृद्धिंगत व्हावी तसेच आपल्या देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात असलेल्या भरीव योगदानाबद्दलची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी ही या परीक्षेची उद्दिष्टे आहे.

भारतीय वैज्ञानिकांच्या कार्याचा परिचय व्हावा आणि त्यापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या वर्षी थोर भारतीय वैज्ञानिक नोबल पारितोषिक विजेते भारतरत्न चंद्रशेखर व्यंकट रमण यांची जीवनगाथा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी असणार आहे. भारतरत्न चंद्रशेखर व्यंकट रमण यांचे चरित्र भारताचे विज्ञान विश्वातील योगदान आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि विज्ञान हा विशेष अभ्यासक्रमाही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून दिला जाणार आहे. नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम उपलब्ध होईल.

नोंदणी प्रक्रिया व परीक्षेचे स्वरूप

इयत्ता सहावी ते अकरावी मधील मराठी तसेच इंग्रजी माध्यमातील सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात. यावर्षी मुख्य परीक्षा 27 नोव्हेंबर 2022 रविवार आणि 30 नोव्हेंबर 2022 बुधवारी या दिवशी होणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवशी आपल्या घरून अथवा शाळेमधून मोबाईल द्वारे अँड्रॉइड परीक्षा द्यायची आहे परीक्षेचा कालावधी हा दीड तास म्हणजेच 90 मिनिटे असणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मोबाईलवर परीक्षेच्या ॲपवरील लॉगिन करून कोणत्याही वेळी दीड तासांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. मुख्य परीक्षा विद्यार्थ्यांना देणे सोपे व्हावे म्हणून चाचणी परीक्षा मॉक टेस्ट दिनांक एक नोव्हेंबर पासून घेण्यात येणार आहे. मराठी हिंदी इंग्रजी बरोबरच अन्य बारा भारतीय भाषांमध्ये परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना या भाषांपैकी कोणत्याही भाषेत परीक्षा देता येईल.


मुख्य परीक्षेचे स्वरूप हे बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच एम सी क्यू असे असून यामध्ये 100 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जातील. विभाग मध्ये भारताचे विज्ञानातील योगदान, भारतरत्न चंद्रशेखर व्यंकट रमण यांची जीवनगाथा आणि भारतीय स्वातंत्र्यसंग्राम आणि विज्ञान यावर आधारित 40 प्रश्न विचारले जातील. विभाग अ हा 40 गुणांचा असून यासाठी वेळ तीस मिनिटे असणार आहे.

विभाग ब मध्ये विद्यार्थ्यांच्या गणित व विज्ञान या शालेय अभ्यासक्रमातील विषयांवर आधारित 50 प्रश्न 50 गुणांसाठी आणि सामान्य तर्कशास्त्रावर आधारित दहा प्रश्न दहा गुणांसाठी विचारण्यात येतील विभाग ब हा एकूण 60 गुणांचा असून यासाठी वेळ 60 मिनिटे असणार आहे. जर विभाग मध्ये विद्यार्थ्यास 20 गुण किंवा अधिक गुण मिळाले तरच ब चे मूल्यांकन करण्यात येईल.

राज्यातील सर्वाधिक गुण मिळवलेले प्रत्येक इयत्तेतील वीस विद्यार्थी हे राज्यस्तरीय शिबिरासाठी स्टेट लेवल कॅम्प साठी पात्र ठरतील. तसेच राज्यस्तरीय शिबिरांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेले प्रतीक इयत्तेतील दोन विद्यार्थी हे राष्ट्रीय शिबिरासाठी पात्र ठरतील. राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन हे रविवार आठ पंधरा किंवा 22 जानेवारी 2023 या दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी कर राष्ट्रीय शिबिराचे आयोजन हे 20 आणि 21 मे 2023 या दिवशी करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय शिबिर आणि राष्ट्रीय शिबिर हे प्रयोग निरीक्षण आणि विश्लेषण क्षमता परिस्थितीजन्य समस्येचे निराकरण करण्याची क्षमता सर्जनशीलता नेतृत्व गुण इत्यादी घटकांवर आधारित असेल. या शिबिरांची विस्तृत माहिती मुख्य परीक्षेनंतर देण्यात येईल.


परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये.

1) राष्ट्रव्यापी महाप्रयोग : यावर्षी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहारशास्त्र आणि पर्यावरण या संकल्पनेवर आधारित एका महाप्रयोगाचे आयोजन केले जाणार आहे. या प्रयोगात विद्यार्थी स्वतःच्या दैनंदिन भोजनामध्ये समाविष्ट असणाऱ्या अन्नपदार्थांचे पोषणमूल्य आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम यावर प्रत्यक्ष निरीक्षणाच्या आधारे अनुमान मांडणार आहे. आपल्या घरूनच विद्यार्थी या प्रयोगांमध्ये सहभागी होतील प्रयोगांची माहिती नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ईमेल द्वारे कळविण्यात येईल.

2) सृजन प्रशिक्षण कार्यक्रम :- या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय आणि क्षेत्रीय पातळीवरील विजेत्या विद्यार्थ्यांना आपल्या देशातील नामवंत संशोधन संस्थांमध्ये उदाहरणार्थ इस्रो डीआरडीओ सीएसआयआर बी ए आर सी इत्यादी स्वतः भेट देऊन प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी साधारण एक ते तीन आठवडे असणार आहे.

3) भास्कर शिष्यवृत्ती :- भास्कर शिष्यवृत्ती योजना राष्ट्रीय विजेत्यांसाठी आहे. एक वर्षासाठी रुपये दोन हजार प्रति महिना असे या शिष्यवृत्तीची स्वरूप आहे. सृजन प्रशिक्षणानंतर राष्ट्रीय विजेत्यांना एखादा प्रकल्प नेमून देण्यात येईल आणि त्या प्रकल्पाचे विषय तज्ञांकडून मूल्यांकन केले जाईल. या मूल्यांकनानंतर विजेत्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल.

4) रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र:- राष्ट्रीय क्षेत्रीय व राज्यस्तरावरील विजेत्या विद्यार्थ्यांसाठी रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहेत.


सध्या परीक्षेसाठी नोंदणी चालू आहे. नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सोपी असून विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरच वैयक्तिकरित्या नोंदणी अथवा शाळेच्या माध्यमातून नोंदणी करता येईल संस्थेमार्फत नोंदणीसाठी रुपये दोनशे रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. नाव नोंदणीचा अंतिम दिनांक 20 ऑक्टोबर 2022 आहे. नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी.

http://vvm.org.in

या संकेतस्थळास भेट द्यावी.

इयत्ता सहावी ते अकरावीच्या इच्छुक विद्यार्थी शिक्षकांनी परीक्षेला नाव नोंदणी करण्यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी. तथापि या परीक्षेच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात येऊ नये.




 वरील विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षे संदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांचे संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.