तासिका तत्वावरील अध्यापकांच्या/शिक्षकांच्या नियुक्ती करिता कार्यपद्धती निश्चित करणे बाबत - शासन निर्णय.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करून तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या नियुक्ती करिता कार्यपद्धती निश्चित केली आहे.
नेट सेट एचडी धारक संघर्ष समितीच्या विविध मागण्यांबाबत माननीय मंत्री उच्च व तंत्रशिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 27 जून 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे बैठक झाली होती. सदर बैठकीत तासिका तत्त्वाच्या धोरणात सुधारणा करण्यासाठी शिक्षण संचालक उच्चशिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात यावी असे निर्देश माननीय मंत्री महोदयांनी दिले होते. त्यानुसार तासिका तत्त्वावरील नियुक्तीच्या धोरणाचा आढावा घेऊन नवीन पर्याय धोरणाबाबत शासनास शिफारस करण्यासाठी शासन निर्णय दिनांक 10 ऑगस्ट 2021 अन्वये संचालक उच्च शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्य समिती गठित करण्यात आली होत. समितीने आपला अहवाल दिनांक 21 फेब्रुवारी 2022 च्या पत्रान्वय सादर केला आहे.
तासिका तत्त्वाच्या धोरणासंदर्भात उपरोक्त समितीने विविध नऊ शिफारशी केल्या आहेत. त्यापैकी तासिका तत्त्वावरील अध्यापकांनी विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केलेली शैक्षणिक अहर्ता धारण करणे व तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या नियुक्तीसाठी कार्यपद्धती विहित करणे याबाबत शिफारसी स्वीकारण्यास शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करणे, तासिका तत्त्वावरील अध्यापकाचे मानधन नियमित अध्यापकांप्रमाणे थेट बँक खात्यावर जमा करणे, शिल्लक कार्यभरावर तासिका तत्त्वावरील अध्यापकांची नियुक्ती करणे या शिफारशी विभागाने प्रस्तावित केलेल्या बदलांसह स्वीकारण्यास शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच तासिका तत्त्वावरील अध्यापकांना केलेल्या सेवांचा अनुभव प्रमाणपत्र देणे, तासिका तत्वावरील अध्यापकांना परीक्षा विषयक पर्यवेक्षण व मूल्यांकनाचे काम देणे, तासिका तत्त्वावरील अध्यापकांची त्याच महाविद्यालयांमध्ये पुनर्नियुक्ती करावयाचे असल्यास नव्याने कार्यपद्धती राबविण्यात येऊ नये व प्रचलित आरक्षण धोरणानुसार तासिका तत्वावरील अध्यापकांची नियुक्ती करणे या शिफारशी नाकारल्या आहेत त्या अनुषंगाने आदेश निर्गमित करण्यात येत आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या सेवा उपलब्ध होऊन शैक्षणिक कामकाज सुरळीतपणे पार पाडता यावे याकरिता तासिका तत्वावरील अध्यापकांची प्रत्येक वर्षी नियुक्ती करण्यासंदर्भात पुढील प्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे.
उपलब्ध कार्यभार निश्चित करणे संबंधित विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण यांच्या स्तरावरून ना हरकत प्रमाणपत्र देणे व्यवस्थापन स्तरावरील जाहिरात व निवड पद्धती विद्यापीठ मान्यता याबाबतीत कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
सदर कालबद्ध कार्यक्रमानुसार संबंधित महाविद्यालय विद्यापीठ व सहसंचालक उच्च शिक्षण यांनी समन्वय साधून ऑनलाइन द्वारे कार्यवाही करावी.
संबंधित महाविद्यालयाने तासिका तत्त्वावरील अध्यापकांची विहित कार्यपद्धतीनुसार नियुक्ती झाल्याची खात्री करावी. तदनंतर तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन वेळेवर अदा करण्यासाठी आवश्यकता कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव सहसंचालक उच्च शिक्षण यांना सादर करावा. सहसंचालक उच्च शिक्षण यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होत असल्याची खात्री करावी आणि तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन संबंधित महाविद्यालयामार्फत थेट बँक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही करावी. तसेच तासिका तत्त्वावरील मानधन अदा करण्याबाबतचा दस्ताऐवज कार्यालयात जतन करून ठेवावा.
एका पूर्णवेळ रिक्त पदाकरिता फक्त दोनच तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या नेमणुका करण्यास तसेच एका अध्यापकाकडे जास्तीत जास्त नऊ तासिकांचा कार्यभार सुकवण्यास दिनांक 14 नोव्हेंबर 2018 च्या शासन निर्णयान्वय मान्यता देण्यात आलेली आहे. वरील प्रमाणे अध्यापकांकडे कार्यभार सुकवल्यानंतर देखील कार्यभार शिल्लक राहत असल्यास उर्वरित कार्यभारासाठी तासिका तत्वावरील अध्यापकाची नियुक्ती करता येईल तथापि उर्वरित कार्यभार हा किमान नऊ तासिकांचा असेल याची दक्षता घ्यावी.
अकृषी विद्यापीठे व संलग्नित वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये नियुक्त करावयाच्या अध्यापकांकरीता विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य शासनाने वेळोवेळी शैक्षणिक अहर्ता इतर अहर्ता विहित केले आहेत. तासिका तत्त्वावरील अध्यापक म्हणून नियुक्ती करता उमेदवारांनी उपरोक्त अहर्ता धारण करणे बंधनकारक राहील.
तासिका तत्त्वावरील नियुक्ती शैक्षणिक वर्षासाठी मर्यादित असून सदर नियुक्ती पूर्ण वेळ नियुक्ती नाही तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी आरक्षण अधिनियम 2001 मध्ये सदर अधिनियम तासिका तत्त्वावर न्यू त्यांना लागू असल्याबाबत कोणतीही तरतूद संदर्भित नाही. त्यामुळे तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या नियुक्ती त्यांना आरक्षण लागू होणार नाही.
सदर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या अनौपचारिक पत्र दिनांक 31 मे 2022 अन्वये दिलेल्या अभिप्रायानुसार निर्गमित करण्यात आला आहे.
वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments