आज दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण!
वाचूया सूर्यग्रहणाबद्दल महत्त्वाचे!
आज मंगळवार दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळ 4:29 मिनिटांनी सूर्यग्रहण सुरू होणार आहे ते संध्याकाळी 6:09 मिनिटांपर्यंत दिसणार आहे.
2022 मधील हे दुसरे व शेवटचे सूर्यग्रहण आहे. आज सूर्यग्रहण हे खंडग्रास स्वरूपात दिसणार आहे.
जाणून घेऊया सूर्यग्रहणाबद्दल अधिक माहिती.
जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे साधारण सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा अमावस्या ही तिथी असते. म्हणजेच सूर्यग्रहण हे अमावस्येलाच होते. पृथ्वीच्या ज्या ज्या भागांवर चंद्राची सावली पडते अशाच भागांवरून सूर्यग्रहण दिसते अशी सावली पुढे पुढे सरकत जाते तसे संबंधित भागांवर त्या त्यावेळी सूर्यग्रहण दिसते.
खग्रास सूर्यग्रहण
खग्रास म्हणजे पूर्ण ग्रासणे. पृथ्वीवरून पाहता चंद्र आणि सूर्य यांचे कोणीय माप साधारण सारखेच असल्यामुळे चंद्र आणि सूर्य यांचे आकारमान आपल्याला एक सारखेच भासते. त्यामुळे जेव्हा चंद्र सरळ निश्चित पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवरून पाहता तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकतो. यावेळी सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो. अशा स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात चंद्र मध्ये आल्याने पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश अडवला जाऊन तेथे चंद्राची गडचवली प्रछाया पडते. पृथ्वीवरील गडद सावलीच्या भागातून खग्रास सूर्यग्रहण दिसू शकते.
खंडग्रास सूर्यग्रहण.
खंडग्रास म्हणजे काही भाग ग्रासणे. सूर्य हा आपल्या जवळचा तारा असल्याने तो विस्तारित प्रकाशित आहे चंद्र मध्ये आल्याने पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश अडवला जाऊन जशी चंद्राची गडद सावली प्रच्छाया तयार होते. तशीच विस्तारित प्रकाश स्त्रोतामुळे प्रछायेभोवती फिकट सावली उपछाया देखील पडते. उपछायेमुळे खंडग्रास सूर्यग्रहण दिसते.
आजचे सूर्यग्रहण हे खंडग्रास सूर्यग्रहण आहे.
खंडग्रास सूर्यग्रहण मागे दोन कारणे असू शकतात.
पृथ्वीवरील या फिकट सावलीच्या भागातून पाहिल्यास सूर्याचा काही भाग झाकलेला दिसतो तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
कधी कधी चंद्र सूर्य आणि पृथ्वी यामध्ये अगदी एका रेषेत न येता थोडा वर किंवा खाली असतो या स्थितीमध्ये चंद्राची प्रछाया पृथ्वीवर पडत नाही पण उपछाया काही प्रमाणात पृथ्वीवर काही भागांवर पडते या भागांमधून आपल्याला खंडग्रास सूर्यग्रहण दिसते.
कंकणाकृती सूर्यग्रहण.
चंद्राची पृथ्वी भोवतालची कक्षा थोडी लंब वर्तुळाकार असल्याने चंद्राची पृथ्वीपासूनचे अंतर हे सतत थोड्याफार प्रमाणात बदलत असते. याचा परिणाम म्हणून चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा आकारही बदलत असतो. चंद्राची पृथ्वीपासूनचे अंतर जास्त असताना चंद्र पृथ्वी आणि सूर्य यामध्ये एक रेषेत आल्यास चंद्राचे कोणीय माप हे सूर्यापेक्षा लहान असल्याने सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही त्यामुळे चंद्रामागे झाकल्या गेलेल्या सूर्य बिंबाचा आकार बांगडी सारखा दिसतो या स्थितीला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.
सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक असल्याने ग्रहणाची चष्मे लावूनच किंवा सूर्य लिंबाचे आरसा वापरून प्रतिबिंबाचे भिंतीवर किंवा पडद्यावर प्रक्षेपण करून पाहणे निर्धोक असते.
तेजोवलय
खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस सूर्य चंद्रमागे गेल्यानंतर चंद्राच्या भोवती वर्तुळाकार प्रखर किरणे दिसतात यालाच तेजो वलय असे म्हणतात. हे तेजो वलय म्हणजे एरवी आपणास न दिसू शकणारे सूर्याच्या दृश्यपृष्ठभागाबाहेरील अति तप्त असे आवरण असत.
दर अमावस्या किंवा पौर्णिमेला सूर्य किंवा चंद्रग्रहण का होत नाही?
अमावस्येला पृथ्वी सापेक्ष सूर्य व चंद्र एकाच दिशेला उगवतात म्हणजेच त्यांच्यातील पूर्व पश्चिम अंतर सर्वात कमी किंवा शून्य होते पण भ्रमण कक्षेच्या पातळीतील फरकामुळे त्यांचे दक्षिणोत्तर अंतर शिल्लक राहते ते ज्यावेळी सर्वात कमी किंवा शून्य होते तेव्हाच ग्रहण घडू शकते.
सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण घडते हे आपण पूर्वी पाहिले आहे सूर्य व चंद्र पृथ्वीस अपेक्षा जरी पूर्वेलाच किंवा पश्चिमेलाच असले तर चंद्र सूर्याच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस असेल तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडणारच नाही म्हणजे सूर्यग्रहण होणार नाही चंद्राची छाया पृथ्वीवर न पडता ती उत्तर किंवा दक्षिणेकडून जाईल अशावेळी पृथ्वीवरून सूर्यग्रहण दिसणारच नाही अशीच घटना पौर्णिमेला चंद्राबाबत घडते पृथ्वीची सावली चंद्रावर पडली तरच चंद्रग्रहण होईल पण त्यासाठी त्यांचे पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण अंतर शून्य किंवा कमीत कमी व्हायला हवे.
ग्रहण वेळरेखा.
प्रत्येक वेळी जेव्हा आकाशात सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान नवीन स्पष्ट छेदनबिंदू येतो त्याला संपर्क असे म्हणतात. ग्रहणामध्ये कमीत कमी दोन संपर्क असतात ज्यांना फक्त पहिला संपर्क आणि शेवटचा संपर्क म्हणून ओळखले जाते. जेव्हा चंद्र पहिल्यांदाच सूर्याच्या काठावर दिसतो आणि चंद्र दुसऱ्या काठावर शेवटच्या वेळी दिसतो तेव्हा असे एकूण आणि वर्षाकार ग्रहांमध्ये दुसरा आणि तिसरा संपर्क असतो हे असे वेळा असतात जेव्हा चंद्राच्या उलट काठाने संपूर्ण कवर होतो किंवा दिसतात.
सूर्यग्रहण कसे पाहावे.
ग्रहण पाहताना कधीही सूर्याकडे थेट पाहू नका कारण सूर्याच्या तीव्र किरणांमुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. ग्रहण पाहण्यासाठी चे खास फिल्टर लावलेले चष्मे घालूनच ग्रहण पहावे.
पिन होल कॅमेरा घरातील चाळणी किंवा फिल्टर असलेल्या सौर दुर्बिणीच्या माध्यमातून सूर्याचे प्रतिबिंब एखाद्या पडद्यावर पाडूनच ग्रहण पहावे.
ग्रहण आणि अंधश्रद्धा
ग्रहण पाळण्याची अंधश्रद्धा अजूनही अनेक ठिकाणी आहे विशेषतः गर्भवती महिलांना ग्रहण काळात काही पथ्य पाळावीत असे सांगितले जाते. पद्धतीने पाळल्यास जन्माला येणाऱ्या बालकात व्यंग निर्माण होतो अशी भीती घातली जाते. ग्रहण ही अवकाशात घडणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्याचा पृथ्वीवर राहणाऱ्या माणसाच्या नशिबावर दैनंदिन कामावर त्याच्या शुभ अशुभवावर काही परिणाम होत नसतो.
चला तर मग आजचे सूर्यग्रहण बघूया!
सूर्यग्रहणाबाबत अधिक माहिती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments