स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची माहिती अद्यावत करणे बाबत शिक्षण संचालकांचे पत्र

स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची माहिती अद्यावत करणे बाबत शिक्षण संचालकांचे पत्र.


प्राथमिक शिक्षण संचालक यांचे कार्यालयातील दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार स्टुडन्ट पोर्टल मधील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची माहिती अद्यावत करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ई गव्हर्नन्स अंतर्गत एन आय सी पुणे यांच्याकडून विकसित करण्यात आलेल्या स्टुडन्ट पोर्टलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या आधार क्रमांक ची नोंद घेणे अनिवार्य आहे.  याबाबत आपणास शासन परिपत्रकांद्वारे कळविण्यात आले होते. तसेच वेळोवेळी व्हीसी द्वारे घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये देखील विद्यार्थ्यांची सरल प्रणाली मधील माहिती त्यांच्या आधार क्रमांकानुसार नोंदविण्याचा किंवा अद्यावत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत परंतु अद्याप बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक कांची नोंद घेणे अद्याप बाकी असून ज्या काही विद्यार्थ्यांच्या नोंदी झाल्या आहेत त्यामध्येही बऱ्याच प्रमाणात त्रुटी आढळल्या आहेत.

माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी ऑनलाईन बैठक घेण्यात आलेली असून माननीय संचालक महोदयांनी खालील प्रमाणे उपाय योजना राबवून विद्यार्थ्यांची आधार नोंदणी दुरुस्ती दिनांक 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत

आधार नोंदणी करणे बाबत.

माननीय जिल्हाधिकारी यांना विनंती करून त्यांच्याकडून प्रत्येक तालुक्यास किमान दोन आधार किट ऑपरेटरसह उपलब्ध करून घ्यावेत तसेच आधार कॅम्पस देखील आयोजित करावेत.

शाळेच्या जनरल रजिस्टर द्वारे विद्यार्थ्याचे नाव जन्मतारीख व लिंग आणि स्टुडन्ट पोर्टलमध्ये विद्यार्थ्याचे नमूद केलेले नाव जन्मतारीख व लिंग हे आधार कार्ड वरील उल्लेखित माहितीशी सुलसंगत असल्याची खात्री करावी जिथे आधार अपडेट करावयाची विद्यार्थी जास्त आहेत तिथे गटशिक्षणाधिकारी यांनी ऑपरेटर्सच्या कामाचे नियोजन करावे आपल्या जिल्ह्यातील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आढावा बैठकीतून सरल पोर्टलवर आधार अपडेट साठी शाळेच्या स्तरावर मुख्याध्यापक यांना सूचना व मार्गदर्शन देण्याबाबत विनंती करावी.

आधार माहिती ऑफलाइन बल्क मध्ये नोंदवून नंतर ऑनलाईन नोंदविण्यापेक्षा विद्यार्थिनी हाय स्वतंत्रपणे नोंदवावी की ज्यामुळे आधार नोंदणीची पुनरावृत्ती होणार नाही.

ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्याप काढलेली नाही अशा विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्यास अंगणवाडी सेविकांची मदत घ्यावी.

सदर कामी आपलीकडील एम आय एस कॉर्डिनेटर डाटा ऑपरेटर विषयतज्ञ साधन व्यक्ती विषय तज्ञ डाटा ऑपरेटर फिरते विशेष शिक्षक यांनी प्रत्येकी किमान शंभर विद्यार्थ्यांची जबाबदारी सोपविण्यात यावी. तसेच या सर्वांचे शाळा भेटीच्या वेळापत्रकाचे नियोजन करून नियोजित शाळेच्या मुख्याध्यापकांची युजर आयडी व पासवर्ड घेऊन आधार नोंदणीच्या कामास सुरुवात करावी व त्यांची कामावर नियंत्रण व पर्यावीक्षण करण्याचे काम संबंधित तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्ताराधिकारी यांचे कडे सोपवण्यात यावे तसेच त्यांनी देखील स्वतः शाळा भेटी देण्याची नियोजन करावी त्यांचे नियोजन शिक्षणाधिकारी य यांनी नियंत्रण करावे.


आधार क्रमांक दुरुस्ती करणेबाबत

शाळेच्या जनरल रजिस्टर द्वारे स्टुडन्ट पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांचे नाव जन्मतारीख व लिंग आधार कार्ड वरील उल्लेखित माहितीशी संगत नसल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाशी संपर्क साधून तातडीची दुरुस्ती करावी आधार कॅम्पस मध्ये याबाबत जागरूकतेने कार्यवाही करावी.

आधार कार्ड वरील माहिती दुरुस्त करावयाची असल्यास आधार कॅम्पची मदत घेण्यात यावी दुरुस्त केलेल्या माहितीनुसार आधार क्रमांकाचा तपशील स्टुडन्ट पोर्टल मध्ये अद्यावत करण्यात यावा.

स्टुडन्ट पोर्टलमध्ये एकाच विद्यार्थ्याचे नाव एकापेक्षा अधिक वेळा नमूद केली नसल्याची खात्री करावी.

अशाप्रकारे संपूर्ण कामाचा निपटारा दिनांक 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत शंभर टक्के पूर्ण करावा.



 वरील शिक्षण संचालक यांची परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.