शिक्षकांच्या जेष्ठता सूची बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षकांच्या सेवाजेष्ठता सूचीबाबत दिनांक 3 मे 2019 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
पदवीधर शिक्षकांच्या ज्येष्ठता सूची बाबत कार्यपद्धती दिनांक 14 नोव्हेंबर 2017 आणि 24 जानेवारी 2017 च्या परिपत्रकांवर विहित करण्यात आलेली होती सदर परिपत्रकास माननीय उच्च न्यायालय मुंबई प्रीती याचिका दाखल करून त्यास आवाहनित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने खालील प्रमाणे आदेश पारित केले आहेत.
We therefore allow all the writ petitions, holding :
(a) The two Government Circulars of 24 th January 2017 and 14th
November 2017 may stand unaffected vis-à-vis the primary Teachers.
(b) Those two Government Circulars, however, cannot be sustained vis-
à-vis the Secondary Teachers, to the extent those GRs mandate that the teachers
seniority be reckoned from the date of their first appointment and continuous service.
(c) The Government and the authorities concerned, including the School
Managements, will recalibrate the relative seniority of the Secondary Teahers based on
the Category they belong to and based on when they have entered that Category.
So we declare. No order on costs.
माननीय न्यायालयाच्या उक्त आदेशानुसार शिक्षकांची सेवा जेष्ठतेबाबत 14 नोव्हेंबर आणि 24 जानेवारी 2017 ची परिपत्रक अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक दिनांक 14 नोवेंबर 2017 आणि 24 जानेवारी 2017 अतिरिक्त करण्यात आहे.
खाजगी शाळेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची सेवाजेष्ठता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 नियम 12 मधील अनुसूचित फ मधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात यावी माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची सेवाजेष्ठता संबंधित शिक्षक त्या त्या प्रवर्गात समावेश झाल्याच्या दिनांकापासून ठरविण्यात यावी.
महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981.
वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments