राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2022-23 अन्वय भूमिका अभिनय व लोक नृत्य स्पर्धांचे आयोजन

 राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2022-23 अन्वय भूमिका अभिनय व लोक नृत्य स्पर्धांचे शाळा - तालुका ते राष्ट्रीय स्तरापर्यंत आयोजन.


माननीय संचालक राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे दिनांक 30 सप्टेंबर 2022 चे पत्रानुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य यांनी राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2022 23 अन्वये भूमिका अभिनय व लोक नृत्य स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यासंबंधी पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.. 

कृती आराखडा गट क्रमांक चार नुसार करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये तालुका जिल्हा व विभाग राज्यस्तरावर लोक नृत्य व भूमिका बिनस स्पर्धा आयोजित करावयाच्या आहेत सदर दोन्ही स्पर्धा या शाळास्तर तालुकास्तरी जिल्हास्तरी याप्रमाणे आयोजित करावयाचे आहेत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील या संबंधात नियोजन आहे सदर स्पर्धा सर्व शासकीय आश्रम शाळा जिल्हा परिषद नगर परिषद समाज कल्याण नवोदय विद्यालय केंद्रीय विद्यालय या व्यवस्थापनांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहे सदर स्पर्धांचे तपशील पुढीलप्रमाणे.

भूमिका अभिनय स्पर्धा:-

इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असावा.

सादरीकरण शालेय गणवेशातच करणे बंधनकारक आहे.

वेळ पाच ते सहा मिनिट.

विद्यार्थी संख्या चार ते पाच.

शिक्षक संख्या दोन.

स्पर्धेचे माध्यम केवळ हिंदी किंवा इंग्रजी असाव.

शाळेत दिव्यांग विद्यार्थी असल्यास किमान एकाला तरी प्राधान्य द्यावे.


भूमिका अभिनय सादरीकरण विषय:-


निरोगी वाढ, पौष्टिक आहार, वैयक्तिक सुरक्षा - शारीरिक, मानसिक, भावनिक आणि लैंगिक, इंटरनेटचा सुरक्षित वापर आणि मीडिया साक्षरता, अमली पदार्थांचा गैरवापर व त्याची कारणे आणि प्रतिबंध.


लोकनृत्य स्पर्धेसाठी नियम:-

इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असावा.

सादरीकरणासाठी वेशभूषा केशभूषा विषयास अनुसरून असावी.

वेळ पाच ते सहा मिनिट.

विद्यार्थी संख्या चार ते सहा.

शिक्षक संख्या दोन

मुलींचा सहभाग असेल तर एक पुरुष व एक महिला शिक्षिका असाव्यात.

भाषा स्थानिक भाषा

शाळेत दिव्यांग विद्यार्थी असल्यास किमान एकाला तरी प्राधान्य द्यावे.

लोकनृत्य स्पर्धेसाठी सादरीकरणाचे विषय.

मुली व मुलींसाठी समान संधी 

मुलांच्या विकासात संयुक्त कुटुंबाची भूमिका, 

पर्यावरण संरक्षण प्रतिबंध कमी करणे पुनर्वापर आणि रिसायकल

मादक द्रव्यांचे सेवन रोखणे, 

पौगंडअवस्थेतील निरोगी नातेसंबंध.


सर्वसाधारण सूचना:-

लोकनृत्य व भूमिका अभिनय सादर करताना कोणत्याही धर्म जात पंथ राष्ट्रपुरुष थोर संत यांचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी.

प्रत्येक तालुक्यातील स्पर्धानिहाय प्रथम क्रमांक ची एक एक संघ जिल्हास्तरावर पाठवावे तसेच जिल्हास्तरावर येताना लोकनृत्य स्पर्धेसाठीचे आपले गीत पेन ड्राईव्ह मध्ये सोबत घेऊन यावे.

दोन्ही स्पर्धांना स्थानिक पातळीवर उचित प्रसिद्धी द्यावी व कोणत्याही शाळेतील संघ किंवा विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी सर्व शाळांपर्यंत स्पर्धेची माहिती द्यावी.

तालुकास्तरावर प्रत्येक स्पर्धा साठी तीन परीक्षक असावेत त्यामध्ये गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी स्पर्धेमध्ये सहभागी नसलेल्या शाळेचे मुख्याध्यापक किंवा लोकसंख्या शिक्षण विषयातील तज्ञ. कला नृत्य अभिनय या विषयावरील तज्ञ यांचा समावेश असावा.

सदर स्पर्धा तालुकास्तरावर 10 ऑक्टोबर 2022 रोजी आपल्या नियोजनाप्रमाणे घ्याव्यात.

तर जिल्हास्तरावर दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमध्ये सकाळी दहा वाजता सदर स्पर्धा होणार आहेत.

सदर तालुकास्तरीय स्पर्धेतील स्पर्धानिहाय प्रथम क्रमांकाचे संघाची माहिती तात्काळ त्याच दिवशी दिनांक १० ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेला ई-मेलने विशिष्ट प्रपत्रात स्पर्धा न्याय भरून सादर करावी.




वडील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.