पदोन्नती अपडेट - पदोन्नती बाबत शिक्षण आयुक्तालयाचे महत्वपूर्ण परिपत्रक.

 पदोन्नती अपडेट - 

पदोन्नती बाबत शिक्षण आयुक्तालयाचे महत्वपूर्ण परिपत्रक.


शिक्षण आयुक्तालयातून निर्गमित दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी च्या परिपत्रकानुसार सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना जिल्हा तांत्रिक सेवा गट क श्रेणी दोन शिक्षण या संवर्गातून उपशिक्षणाधिकारी व तत्सम महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखा या संवर्गात पदोन्नती देण्यासाठी सन 2021-22 च्या निवड सूची मधून महसूल विभागाची पसंती मागविण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

जिल्हा तांत्रिक सेवा गट क श्रेणी दोन शिक्षण या संवर्गातून महाराष्ट्र शिक्षण सेवा गट व प्रशासन शाखा उपशिक्षणाधिकारी व तत्सम या पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नती देण्यासाठी खालील नमूद अधिकाऱ्यांची निवड समितीने शिफारस केली आहे सदर निवड सूची सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेली आहे. 

महाराष्ट्र शासकीय गट व गट व राजपत्रित राजपत्रित सरळसेवेने पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसूल विभाग वाटप नियम 2021 निर्गमित करण्यात आले असून सोबत जोडलेल्या बंधन पत्राच्या नमुन्यामध्ये बंधन पत्र सादर करणेबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे पदोन्नतीने नियुक्ती करता महसूल विभाग वाटण्यासाठी महसूल विभागणी आहे. रिक्त पदांची संख्या सदर पत्रात नमूद करण्यात आली आहे.

शासन निर्णय दिनांक 22 जून 2022 व दिनांक 11 ऑक्टोबर 2022 अन्वय नव्याने जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी योजना कार्यालयासाठी उपशिक्षणाधिकारी योजना कार्यालयासाठी उपशिक्षणाधिकारी योजना अशी एकूण 35 पदे मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी 30 पदे रिक्त पदांमध्ये दर्शविण्यात आलेली आहे. उर्वरित वाशिम हिंगोली गोंदिया नंदुरबार पालघर येथील जिल्हा परिषद कार्यालयात अद्याप आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचा सेवार्थ प्रणाली मध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाही. तसेच प्रशासकीय बाबींची पूर्तता होणे आवश्यक असल्याने उपरोक्त रिक्त पदांमध्ये सदर पाच जिल्ह्यातील उपशिक्षणाधिकारी योजना रिक्त पदांचा समावेश करण्यात आलेला नाही. 

निवड सूचीतील खालील नमूद अधिकाऱ्यांना वरील नमूद महसूल विभाग निहाय रिक्त पदांची संख्या कळवण्यात येत आहे त्यानुसार नागपूर अमरावती औरंगाबाद कोकण विभागाचा भाग असलेला कोकण एक नाशिक कोकण विभागाचा भाग असलेला भाग दोन पुणे पैकी कोणत्याही एकाच मुस्लिम भागाची पसंती सोबत जोडलेल्या बंधन पत्रात शासनास सादर करण्यासाठी या कार्यालयास सादर करण्यात यावा.

सदर पत्रात एकूण 119 अधिकाऱ्यांची यादी दिली आहे. या सर्व अधिकाऱ्यांचे सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांनी प्राप्त नमूद कर्मचाऱ्यांचे बंधन पत्र सोबत जोडलेल्या नमुन्यामध्ये दिनांक एक नोव्हेंबर 2022 पर्यंत शिक्षण आयुक्तालयास समक्ष सादर करण्याबाबत व एक प्रत ई-मेल द्वारे उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे.




वरील पदोन्नती बाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.