ऑनलाइन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दुरुस्ती प्रक्रिये बाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र चे परिपत्रक.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र च्या दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार ऑनलाइन वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दुरुस्ती प्रक्रिये बाबत पुढील प्रमाणे सूचना दिली आहे.
वरिष्ठ व निवड श्रेणी ऑनलाइन प्रशिक्षणासाठी राज्यातील एकूण 94541 शिक्षकांनी नाव नोंदणी केलेली आहे यामध्ये शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य व अध्यापकचार्य यांचे साठी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू करण्यात आले होते.
सदरच्या प्रशिक्षणामध्ये एकूण 91,189 नाव नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी यांनी आपले प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.
सद्यस्थितीमध्ये उर्वरित प्रशिक्षणार्थी यांना काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशिक्षण सुरू करण्यात अथवा पूर्ण करण्यात अडचणी येत आहे. तसेच यापूर्वी देखील प्रशिक्षणार्थी यांना आवश्यक दुरुस्तीची सुविधा कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आली होती. तथापि अद्यापही काही प्रशिक्षणार्थी यांच्याकडून झालेल्या तांत्रिक चुकांमुळे चुकीचा ईमेल आयडी नोंदणी चुकीचा प्रशिक्षण प्रकार अथवा प्रशिक्षण गट नोंदणी करणे लॉगिन तपशील प्राप्त होण्यापूर्वीच प्रशिक्षण सुरू करणे एकाच ईमेल आयडीवरून दोन प्रशिक्षणासाठी नोंदणी करणे इत्यादीमुळे संबंधित प्रश्नार्थी यांना काही दुरुस्ती करावयाचे असल्याने संबंधित प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण प्रलंबित असल्याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयामार्फत
http://training.scertmaha.ac.in/
या संकेतस्थळावर दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदरच्या दुरुस्तीच्या सुविधे मार्फत खालील दुरुस्ती प्रशिक्षणार्थी करू शकणार आहे.
1) प्रशिक्षणाचे लॉगिन उपलब्ध झालेले नसणे.
2) प्रशिक्षण गट तसेच प्रशिक्षण प्रकार यामध्ये बदल करावयाचा असणे.
3) ई-मेल आयडी दुरुस्ती करणे.
4) प्रशिक्षण प्रमाणपत्र दुरुस्ती करणे.
सदरची दुरुस्ती प्रक्रिया ही केवळ ज्या प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण अद्यापही सुरू नाही अशाच प्रशिक्षणार्थी यांचे साठी आहे याची नोंद घ्यावी ज्या प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण सुरळीतपणे सुरू आहे अशा प्रशिक्षणार्थी यांनी कोणतेही प्रकारची दुरुस्ती अथवा बदल करू नये. तसेच आवश्यक दुरुस्ती केल्यानंतर कार्यवाहीबाबतचे देखील
http://training.scertmaha.ac.in/
या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक देण्यात आले आहे.
फक्त नमूद दुरुस्ती सुविधा सर्व उर्वरित प्रशिक्षणार्थी यांना दिनांक 21 ऑक्टोबर २०२२ ते ३१ ऑक्टोबर 2022 या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही याबाबत संबंधित प्रशिक्षणार्थी यांना अवगत करावे.
तरी वरील प्रमाणे प्रशिक्षण दुरुस्ती सुविधा बाबत आपल्या कार्यक्षेत्रांमधील प्रशिक्षणार्थी यांना अवगत करण्यात यावे.
अशा प्रकारचे निर्देश माननीय रमाकांत काठमोरे, सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक सर्व, शिक्षण निरीक्षक मुंबई पश्चिम, दक्षिण व उत्तर, प्रशासन अधिकारी महानगरपालिका/नगरपालिका सर्व यांना संबंधितास कळविणे बाबत दिले आहे.
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments