NMMS परीक्षा वर्ग आठवी 2022-23 परीक्षेची तारीख, ऑनलाइन अर्ज भरणे मुदत प्रसिद्धी पत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.
यावर्षी म्हणजेच 2022 23 या सत्रात आठव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एन एम एम एस परीक्षा नेमकी कधी आहे?
एन एम एम एस या परीक्षेसाठी आपण अर्ज कोणत्या संकेतसळावर व कोणत्या कालावधीत करू शकतो?
कोणते विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात?
वरील प्रश्नांची सविस्तर उत्तरे देण्यासाठी आज दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सदर माहिती दिली आहे ती पुढील प्रमाणे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच एन एम एम एस 2022-23 चे आयोजन इयत्ता आठवी मधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी करण्यात येणार आहे.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडून भरून घ्यावयाचा कोरा NMMS नमुना अर्ज.
इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांची उत्पन्न तीन लक्ष पन्नास हजार रुपये पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.
दिनांक 10 ऑक्टोबर 2022 पासून ऑनलाईन आवेदन पत्रे परिषदेच्या....
व
वरील दोन संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.
महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थिनी या परीक्षेत बसता येते.
पालकांची आई व वडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न 3 लक्ष 50 हजार पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांच्या व व इतरांनी तहसीलदाराचा अथवा तलाठ्याचा सन 2021 22 च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा सदर उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करून ठेवावा.
विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी इयत्ता आठवी मध्ये किमान 55 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती चा विद्यार्थी किमान 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.
विनाअनुदानित शाळेत शिकणारी विद्यार्थी सदर परीक्षेसाठी पात्र नाहीत.
केंद्रीय विद्यालयात शिकणारी विद्यार्थी सदर परीक्षेसाठी पात्र नाहीत.
जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारी विद्यार्थी सदर परीक्षेत पात्र नाही.
शासकीय वस्तीगृहाच्या सवलतीचा भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी सदर परीक्षेत पात्र नाही.
सैनिक सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी देखील सदर परीक्षेत पात्र नाही.
महाराष्ट्रातील विविध केंद्रावर शिक्षणाधिकारी माध्यमिक किंवा शिक्षण निरीक्षक मुंबई यांच मार्फत दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे सदर परीक्षेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे.
बौद्धिक क्षमता चाचणी ही 90 गुणांची 90 प्रश्न असणारी चाचणी सकाळी दहा वाजून 30 मिनिटे ते बारा वाजेपर्यंत होईल.
तर शालेय क्षमता चाचणी ही 90 गुणांची एकूण 90 प्रश्न असणारी चाचणी दुपारी एक वाजून तीस मिनिटे ते दुपारी तीन वाजेपर्यंत होईल.
वरील दोनही चाचण्यांमध्ये विद्यार्थ्यांना किमान 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक राहील.
सदर परीक्षेसाठी शाळा संलग्नता ही म्हणून दोनशे रुपये प्रति संस्था एका शैक्षणिक वर्षासाठी राहील.
ऑनलाइन नियमित आवेदन पत्र भरण्यासाठी प्रति आवेदन पत्र शुल्क 120 रुपये एवढे राहील.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चे प्रसिद्धी पत्रक संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments