वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षण प्रमाणपत्र बाबत एम एस सी ई आर टी चे परिपत्रक.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या ग्राह्यतेबाबत पुढील प्रमाणे स्पष्टीकरण दिले आहे.
शासन निर्णयान्वये वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयामार्फत सुरू करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्यासाठी कार्यालयामार्फत ऑनलाईन पोर्टलचे विकसन करून या मार्फत प्रशिक्षण नाव नोंदणी करून घेण्यात आली होती.
सदर पोर्टलवर नाव नोंदणी करीत असताना बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 च्या अनुषंगाने वर्ग जोडण्याबाबत शासन निर्णय दिनांक 28 ऑगस्ट 2015 मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्राथमिक शाळा इयत्ता पहिली ते पाचवी उच्च प्राथमिक शाळा इयत्ता सहावी ते आठवी व माध्यमिक शाळा इयत्ता नववी ते दहावी असेच तर विचारात घेऊन प्रशिक्षण स्तर/गट निवडण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते.
व शिक्षकांनी त्याप्रमाणेच योग्य गटासाठी पर्याय निवडले होते. प्राथमिक शिक्षक इयत्ता पहिली ते आठवी गट निवडलेल्या शिक्षकांपैकी काही शिक्षक इयत्ता सहावी ते आठवीला शिकवणारे असून माध्यमिक शिक्षकांची वेतनश्रेणी घेत आहेत. अशा शिक्षकांनी वरिष्ठ व निवड श्रेणीची ऑनलाईन प्रशिक्षण प्राथमिक शिक्षक इयत्ता पहिली ते आठवी गटात पूर्ण केले असून पोर्टलवरील नोंदणी नुसार त्यांच्या प्रशिक्षण प्रमाणपत्रावर प्राथमिक शिक्षक व प्रशिक्षण प्रकार नमूद करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ प्राथमिक शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणी अथवा निवड श्रेणी.
तरी बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार वृत्त नमूद नुसार जे शिक्षक इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गाला अध्यापन करीत आहे व ज्यांना माध्यमिक शिक्षकांची वेतनश्रेणी यापूर्वी लागू करण्यात आलेली आहे अशा शिक्षकांचे सद्यस्थितीमध्ये प्राप्त प्राथमिक वरिष्ठ वेतन श्रेणी अथवा निवड श्रेणी प्रमाणपत्र वेतनश्रेणी लागू करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे.
वरील प्रमाणे सुस्पष्ट असे निर्देश महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांचे मान्यतेने माननीय शिक्षण सहसंचालक रमाकांत कोठमारे यांनी दिले आहेत.
वरील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे निवड श्रेणी अथवा वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र संदर्भातील महत्त्वपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments