राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांचे सन अग्रीमासह पगार दिवाळीपूर्वीच होणार आदेश.

 राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांचे सन अग्रीमासह पगार दिवाळीपूर्वीच होणार आदेश.

(Karmachari-Pagar-San-Agrim-Bonas-Salary-Diwali-Aagodarch-Honar-GR) 


माहे ऑक्टोबर 2022 चे वेतन दिवाळीपूर्वी करण्याबाबत शिक्षण उपसंचालकांचे आदेश.


विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी दिनांक 11 ऑक्टोबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार दिवाळीपूर्वी शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींना माहे ऑक्टोबर 2022 चे वेतन मिळणे बाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.


शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण अधिकारी माध्यमिक प्राथमिक, शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई, उत्तर दक्षिण, पश्चिम विभाग तसेच अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक व प्राथमिक यांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर 2022 चे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्याबाबत प्रचलित शासन निर्णयानुसार आवश्यक ती उचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर आदेश पुढीलप्रमाणे. 






राज्यातील सर्व शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर 2022 ची पगार व सन अग्रीम दिवाळीपूर्वी होण्याचे संकेत मिळत आहेत.

यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या अंतर्गत वरिष्ठ कुशावर अधिकारी कार्यालय नागपूर यांनी दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार माहे ऑक्टोबर 2022 मध्ये सादर होणाऱ्या देवकांसंदर्भात पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

कोषागार अधिकारी यांनी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविले आहे की माहे ऑक्टोबर 2022 च्या 24 तारखेला दिवाळी सण आहे त्यामुळे दिवाळीपूर्वीच सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर 2022 चे वेतनाचे प्रदान करण्याचे शासन आदेश निर्गमित होण्याची शक्यता असल्याने दिवाळीपूर्वी वेतन व सनग्रीमाचे प्रदान होणे आवश्यक आहे.

आआफ्टर 2022 महिन्यात दिनांक 3 ऑक्टोबर 2022 ते 24 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आठ दिवस शासकीय सुट्ट्या असल्याने सर्व शासकीय कार्यालय बंद राहतील व कामाचे फक्त 14 दिवस हातात राहतात. या कामाच्या दिवसात वेतन दे की आकस्मिक खर्चाची जयंती प्रधान कोषागार कार्यालयाला देयकाची तपासणी करून करावयाची आहे शासनाची कर्मचारी भरती बंद असल्याने कोषागार कार्यालयातील सर्व विभागात सद्यस्थितीत कर्मचारी वर्ग जवळपास 40 ते 50 टक्के कमी आहे त्यामुळे कामाचा व्याप व कामाचे दिवस लक्षात घेता ऑक्टोबर 2022 महिन्यात कोषागार व उपकोशागार कार्यालयात सादर होणाऱ्या विविध देखा बाबत खालील नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी जेणेकरून आपणास सादर केलेली देयके ही नियमानुसार असल्यास कोषागार कार्यालयास देखे पारित करून दिवाळीपूर्वीच सर्व वेतन व भत्ते व सनग्रीमाचे प्रधान सर्व शासकीय कार्यालयाला करता येणे सोयीचे होईल.

दिनांक 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत सर्व प्रकारची देयके कोषागार कार्यालयात स्वीकारण्यात येतील व दिनांक 11 ऑक्टोबर 2022 ते 21 ऑक्टोबर 2022 या कालावधीत खालील प्रकारची देयके कोषागार स्वीकारण्यात येणार नाहीत.

वैद्यकीय प्रतिकृती देयके प्रवास भत्ता रजा प्रवास संग्राम प्रवास भत्ता सेवानिवृत्तीनंतरचे स्वग्राम प्रवास भक्ता दे की जुन्या कालावधीची वेतन व भत्त्याची थकबाकी द्यायची चालू दोन-तीन महिन्याची प्रलंबित वेतनाची थकबाकी व रजा द्या की स्वीकारण्यात येतील, कालबद्ध पदोन्नती देवकी ही देयके मक्ती राज्य शासनाची अस्तित्वात जिल्हा परिषद अथवा अनुदान शाळा कॉलेज यांची असो ही स्वीकारण्यात येणार नाही.


वेतन व सन अग्रीमाची देयके दिनांक ६ ऑक्टोबर 2022 पासून कोषागार स्वीकारण्यात येतील सन अग्रीमाचे देयकावर सर्व कर्मचाऱ्यांची नावे नमूद असणे आवश्यक आहे तसेच मंजुरी आदेशामध्ये सुद्धा सर्व कर्मचाऱ्यांची नावे नमूद असणे आवश्यक आहे. मंजुरी आदेशामध्ये कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे सहावे वेतन आयोगानुसार नमूद करावा सनग्रीम हा ज्या अराजपात्रित कर्मचाऱ्यांच्या सहावे वेतन आयोगानुसार गिडपे 48 पर्यंत आहे त्यांनाच सन अग्रीम अनुज्ञ आहे राजपत्रित अधिकारी व ग्रेड पे 48 वरील अराजपत्रित कर्मचाऱ्यांना सन अग्रीम अनुज्ञ राहणार नाही. सन अग्रीमाचे देवकांसोबत विहित प्रमाणपत्रे नमूद असणे आवश्यक आहे व सदर देयके बिल पोर्टल मधून सादर करणे आवश्यक आहे.

माहे ऑक्टोबर 2022 ची वेतन देयके कोषागारत उपकोशागत स्वीकारण्याबाबत:- दिनांक 24 ऑक्टोबर 2022 ला दिवाळी असल्याने दिनांक 22 ऑक्टोबर 2022 पूर्वी माहे ऑक्टोबर 2022 चे वेतन प्रदान करण्याचे शासन आदेश निर्गमित होण्याची शक्यता असल्याने सर्व प्रकारच्या वेतन देयकांसोबत प्रथम पृष्ठावर चेंज स्टेटमेंट सोबत जोडणे अत्यावश्यक असून वेतनदेयकांमध्ये कोणत्याही प्रकारची थकबाकी शासनाचे विशेष आदेश असल्यास सोडून नियम क्रमांक 1968 मधील नियम 270 अन्वये काढण्यात येऊ नये थकबाकी काढलेली असल्यास वेतन द्या की ही आक्षेपित करण्यात येतील वेतन देखे ही पोषागरात किंवा सादर करावयाची याबाबत शासन आदेशानंतर दिनांक कळवण्यात येईल.


या कोषागार अधिकारी यांच्या पत्रांमुळे दिवाळीमध्ये कर्मचाऱ्यांना मिळत असणारे सण अग्रीम सोबतच माहे ऑक्टोबर 2022 चे वेतन देखील दिवाळी अगोदर म्हणजेच दिनांक 22 ऑक्टोबर 2022 अगोदर मिळण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.




वरील कोषागार अधिकारी यांचे संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.