कला उत्सव स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत 30 ऑक्टोबर 2022 सायंकाळी 5 वाजेपर्यंत!


माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत सन २०१५-१६ पासून कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश आपला सहभाग नोंदवितात. सन २०२२-२३ मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, तालवाद्य वादन, स्वरवाद्य वादन , शास्त्रीय नृत्य, पारंपरिक लोकनृत्य, द्वीमितीय चित्र, त्रिमितीय शिल्प व खेळणी तयार करणे व नाट्य ( भूमिका अभिनय) या १० कला प्रकारांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे सन २०२२- २३ मध्ये राज्याच्या १० कला प्रकारांचे १० संघ राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या Online कला उत्सवासाठी १० डिसेंबर २०२२ पर्यंत नामनिर्देशित करावयाचे आहेत. राज्याच्या संघ निवडीसाठी वर नमूद कला प्रकारांमध्ये ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.


कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या,सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील ९ वी ते १२ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सर्व कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक (Solo) सहभाग असणार आहे. कला उत्सव स्पर्धेचे निकष सोबत जोडण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी या स्पर्धेबाबतच्या मार्गदर्शक सूचना 


 या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांसाठी सूचना:
  • एक विद्यार्थी केवळ एका कला प्रकारातच सहभाग घेऊ शकतो.
  • सहभागी स्पर्धकांनी सोबत जोडलेल्या निकषांचे वाचन करावे.
  • कोणत्याही कला प्रकारच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केलेली असावी. व्यावसायिक कलाकारांचा सहभाग अथवा त्यांची मदत घेता येणार नाही,असे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेशिका रद्द केली जाईल.
  • निकषात नमूद केल्यानुसार ४ ते ६ मिनिटांचा व्हिडीओ मोबाईल अथवा कॅमेराद्वारे तयार करावा.
  • व्हिडिओमधील चित्र व आवाजात स्पष्टता असावी. तयार केलेला व्हिडीओ व चित्र, शिल्प, खेळणी तयार करणे या कलाकृतींचे सोबत ५ फोटो विद्यार्थ्यांने स्वतच्या/पालक/शिक्षकाच्या फेसबुक, इंस्टाग्राम,ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून #kalautsavmah२०२२ या हॅशटॅगचा वापर करून दि.३० ऑक्टोबर २०२२ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोस्ट करावा. व्हिडीओ पोस्ट करताना विद्यार्थ्यांने आपले नाव, इयत्ता, शाळेचा पत्ता, शाळेचा Udise क्रमांक, तालुका, जिल्हा, मेल आय. डी. संपर्क क्र. व भाग घेत असलेला कला प्रकार इ. उल्लेख करावा .
  • पोस्ट Public असावी, ई- मेल पत्ता स्वत:चा नसेल तर पालक /शिक्षक यांचा ई -मेल वापरावा.
  • फेसबुक, इंस्टाग्राम,ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून व्हिडीओ पोस्ट करताना प्राप्त झालेली कोणतीही एक लिंक copy करून ठेवावी.
  • तदनंतर विद्यार्थ्यांने आपली नोंदणी 
  • https://scertmaha.ac.in/kalautsav/
  •  या पोर्टल जाऊन करावी.
  • नोंदणी मधील सर्व माहिती विद्यार्थ्यांने बिनचूक व पूर्ण भरावी.
  • ही नोंदणी करताना फेसबुक,इंस्टाग्राम,ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करताना यापैकी प्राप्त झालेली कोणतीही एकच link नमूद केलेल्या ठिकाणी Paste करावी.
  • एका स्पर्धेसाठी एका विद्यार्थ्यांची एकच पोस्ट असावी. तसेच एका विद्यार्थ्याला एका वेळी एकाच स्पर्धेत भाग घेता येईल. कला उत्सव स्पर्धेमध्ये राज्य स्तरापर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्याला परत भाग घेता येणार नाही.
  • आपल्या सादरीकरणाची पूर्ण जबाबदारी स्पर्धकाची असेल.
  • एका वेळी एका पोस्टमध्ये एकाच विद्यार्थ्यांचे /पाल्याचे एकाच स्पर्धेचे साहित्य अपलोड करावे. एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे साहित्य अपलोड केल्यास/पोस्ट केल्यास सदर प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.
  • विद्यार्थ्यांच्या /पाल्याच्या व्हिडीओ सादरीकरणामध्ये कोणताही चुकीचा आशय/आक्षेपार्ह विधान केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • #kalautsavmah2022 हा हॅशटॅग लिहिताना अक्षरात कोठेही स्पेस देऊ नये, हॅशटॅगचे स्पेलिंग चुकवू नये.
राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धा सन 2022-23

 Count down begins... कला उत्सव च्या नोंदणी साठी उरले आहेत... अवघे 4 दिवस..... त्यामुळे त्वरा करा... त्वरा करा... जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे सहकार्य घ्या....आणि स्पर्धेसाठी नोंदणी करा....!!! 


 अत्यंत महत्त्वाचे -

✍️  कला उत्सव स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यासाठी  अंतिम मुदत 30 ऑक्टोबर 2022 सायंकाळी  5 वाजेपर्यंत   आहे.
✍️ कृपया या संधीचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या आणि या स्पर्धेसाठी नोंदणी करा.
✍️ राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधून  यंदाच्या कला उत्सव स्पर्धेसाठी विदयार्थी यांचा प्रतिसाद वाढणे गरजेचे.
✍️ कला उत्सव म्हणजे - विद्यार्थ्यांच्या  कला गुणांना वाव देणारे मोठे व्यासपीठ.
✍️ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर परफॉर्म करण्याची संधी.

✍️विद्यार्थ्यांनी फेसबुक, इंस्ट्राग्राम अथवा युट्युब अकाउंटवर स्वतःचा कला सादर करतानाचा व्हिडीओ #kalautsavmah2022 या hashtag अंतर्गत पोस्ट करावा आणि त्याची लिंक एस सी ई आर टी ने दिलेल्या

 https://scertmaha.ac.in/kalautsav

 या पोर्टल वर आवश्यक माहिती भरून पोस्ट करावी.

✍️ सर्व माननीय डाएट प्राचार्य, डाएट अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांनी जास्तीत जास्त विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांना कला उत्सव स्पर्धेची मुदत वाढली असल्याचे अवगत  करावे आणि या कला उत्सव स्पर्धेसाठी विद्यार्थी यांची नोंदणी वाढवावी, असे आवाहन कला क्रीडा विभागाच्या विभाग प्रमुख मा. डॉ. नेहा बेलसरे यांनी केले आहे
✍️ लवकरच  कला उत्सवसाठी विद्यार्थी नोंदणीचे जिल्हानिहाय Status share केले जाईल.
✍️ कला उत्सव संदर्भात  संपूर्ण  पत्र वाचल्यानंतर अधिक माहितीसाठी अथवा काही अडचण असेल तर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी स.10 ते सायं. 6 या कार्यालयीन वेळेत  खालील अधिकारी यांच्याशी दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर  संपर्क साधावा.

श्री. सचिन चव्हाण,उपविभाग प्रमुख (संशोधन तथा कला व क्रीडा)
96230 27453

श्रीमती ज्योती राजपूत
अधिव्याख्याता 
88887 39807

श्रीमती पद्मजा लामरुड विषय सहायक
9822096107


(राजेश पाटील)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे-३०

बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.