निवडणुकांचा चेंडू कोर्टाच्या कोर्टात (न्यायालयात)! अनिश्चितता कायम! जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही!
महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधिकृत फेसबुक पेज वरील बातमीनुसार राज्यातील महानगरपालिका नगरपालिका निवडणुका जानेवारी महिन्यात होणार असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले मात्र त्यात तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. असे समजते.
त्याचप्रमाणे ग्रामपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात 19 ऑक्टोबरला सुनावणी होती ती दोन आठवड्यासाठी पुढे ढकलली आहे.
महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद सदस्य संख्या वाढवण्याबाबत कायद्यात सुधारणा केली आहे. सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असून जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय त्यावर अंतिम निकाल देत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील होऊ शकणार नाहीत.
त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या होऊ घातलेल्या जिल्हाअंतर्गत बदल्या यामध्ये कोणत्याही आचारसंहितेचा खोडा मध्ये येणार नसून, नियोजित वेळापत्रकानुसार जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार आहे.
बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments