बदली अपडेट - जिल्हा अंतर्गत बदली संवर्ग चार बदली पात्र शिक्षक संदर्भात ग्रामविकास विभागाचे आज दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी चे पत्र.
जिल्हा अंतर्गत बदली बदल्यांसाठी ग्रामविकास विभागाचे माननीय मंत्री यांची हिरवी झेंडी मिळाल्यानंतर जिल्हांतर्गत जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रियेला वेग आल्याचे दिसून येते.
जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन 2022 मधील जिल्हाअंतर्गत बदलाबाबत आज दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी ग्रामविकास विभागाने पत्र निर्गमित करून पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत आंतरजिल्हा बदल्यांसाठी दिनांक 7 एप्रिल 2021 च्या दोन स्वतंत्र शासन निर्णय सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत वेळोवेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
दिनांक सात एप्रिल 2021 च्या शासन निर्णया अन्वये विहित करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली प्रक्रिया राबवण्यात आली आहे. आता शासनाच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या बाबतची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. सदर शासन निर्णयात नमूद केल्यानुसार बदली पात्र असलेल्या शिक्षकांना " विवरण पत्र एक बदलीस पात्र शिक्षक मध्ये पृष्ठ क्रमांक 17 व नमूद केल्याप्रमाणे मला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास बदलीने नियुक्तीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा किंवा मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा या पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्याची मुभा असून अशा शिक्षकांनी कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक प्रशासकीय बदलीसाठी पात्र राहतील" अशी तरतूद आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांबाबत दिनांक सात ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा परिषद शिक्षक बदली अभ्यास गट समवेत विसीद्वारे बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या बाबत दिनांक सात एप्रिल 2021 च्या शासन निर्णयाचे विवरणपत्र एक बदलीस पात्र शिक्षक याबाबत खालील प्रमाणे अधिकचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे:-
जर एखाद्या शिक्षकांनी सदर विवरणपत्र एक मध्ये नमूद केलेला उक्त अ) येथील पर्याय निवडल्यास अशा शिक्षकांच्या प्रशासकीय बाबीमुळे होत असलेल्या बदली वेळी उपलब्ध असलेल्या रिक्त जागी अशा शिक्षकांची बदली होईल. सदर बदली पूर्णतः प्रशासकीय असल्याने अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवा जेष्ठतेने बदली मिळेलच असे नाही. मात्र जर एखाद्या शिक्षकाने सदर विवरणपत्र एक मध्ये नमूद केलेला उक्त आ) येथील पर्याय निवडल्यास अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्य क्रमानुसार व सेवा जेष्ठतेने बदली मिळू शकेल.
सदर बाब जिल्हांतर्गत बदलीचे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी संबंधित गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्यामार्फत सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणावी व त्याबाबतची पोच संग्रहित ठेवावी ही विनंती.
वरील प्रमाणे ग्रामविकास विभागाच्या आजच्या परिपत्रकात सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहे.
वरील जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात आजचे परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments