सरकारी अधिकारी/कर्मचारी फोनवर आता 'हॅलो' नव्हे तर 'वंदे मातरम' म्हणणार आजचा शासन निर्णय

 सरकारी अधिकारी/कर्मचारी फोनवर आता 'हॅलो' नव्हे तर 'वंदे मातरम' म्हणणार! आजचा शासन निर्णय.


महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज दिनांक एक ऑक्टोबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव च्या औचित्यानुसार शासकीय कार्यालयांमधील दूरध्वनी भ्रमणध्वनीवर अभ्यास किंवा सहकारी अधिकारी कर्मचारी यांच्याशी करावयाच्या संभाषणाची सुरुवात हॅलो ऐवजी वंदे मातरम या अभिवादनाने करणे बाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.


भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आजादी का मृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव राज्यात साजरा होत आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चे अवचित्य साधून शासकीय कार्यालयातील दूरध्वनी भ्रमणध्वनीवर अभ्यास त्यांची किंवा सहकारी अधिकारी कर्मचारी यांच्याशी करावयाच्या संभाषणाची सुरुवात हॅलो ऐवजी वंदे मातरम या अभिवादन आणि करण्याबाबत माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य यांनी सर्वांना आवाहन केले आहे.

'वंदे मातरम' या शब्दाची ऐतिहासिक पार्श्वभूमी पुढील प्रमाणे आहे:-

वंदे मातरम हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी सन 1870 या वर्षांमध्ये लिहिलेले गीत सन 896 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात सर्वप्रथम गाईले गेले होते सन 1905 ला झालेल्या बंगालच्या फाळणी दरम्यान वंदे मातरम हा पर्वलीचा शब्द होता अनेक क्रांतिकार आणि या गीताचा उद्घोष करतच बलिदान दिले होते इन्कलाब जिंदाबाद व वंदे मातरम या दोन शब्दांनी स्वातंत्र चळवळ भारावून गेली होती. या गीतावर व त्यांच्या गायनावर इंग्रजांनी बंदी घातलेली होती मात्र तत्कालीन राजकीय पक्ष क्रांतिकारक व सर्वसामान्य नागरिक यांनी ही बंदी झुगारून वंदे मातरम गाण्यास सुरुवात केली होती. स्वातंत्र्य चळवळीतील धकधकत्या अग्निकुंडात बलिदान देणाऱ्या अनेक वीरांकडून वंदे मातरम हाच उद्घोष करण्यात येत होता भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हे सर्व मान्य स्फूर्ती गीत होते दिनांक 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या संविधान परिषदेच्या बैठकीची सुरुवातही या गीतानेच झाली होती तसेच जनगणमन या गीतास राष्ट्रगीत आणि वंदे मातरम या गीता राष्ट्रीय गीत म्हणून दिनांक 24 जानेवारी 1950 रोजी संविधान  सभेने मान्यता दिली होती.

आजही अनेक शासकीय कार्यालयात संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास हॅलो या शब्दाने सुरुवात होते काही ठिकाणी जय हिंद तर काही ठिकाणी नमस्ते असेही संबोधले जाते वास्तविक पाहता दोन व्यक्ती एकमेकांना सुरुवातीस संबोधित करताना वेगवेगळी अभिवादने वापरताना आढळून येतात. महाराष्ट्रात नमस्कार सारखे संबोधात्मक शब्द आजही मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात त्याशिवाय हॅलो हाय गुड मॉर्निंग सारखे शब्दही दिसून येतात वेगवेगळे समूह समुदाय धर्म यांच्यामध्येही अभिवादन करण्याच्या विविध प्रथा आहेत वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात या प्रथा सर्वजण आपापल्या परीने जोपासत आहेत व त्या जोपासण्याचा त्यांना अधिकारही आहे.

शासकीय कार्यालयात किंवा शासन व्यवहारात दूरध्वनीवरून किंवा समोरासमोर भेटल्यानंतर कोणत्या शब्दाने अभिवादन करायचे याबाबत स्पष्ट निर्देश नाही. तथापि पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करताना हॅलो हा कोणताही विशिष्ट अर्थ नसलेला व संभाषण कर्त्यांमध्ये कोणतीही आपुलकी न जाणवणारा केवळ एक औपचारिक अभिवादन करणारा शब्द आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयात प्राप्त होणाऱ्या दूरध्वनीवरील संभाषणाची सुरुवात भौतिक वेळा हॅलो या शब्दाने होत असल्याने शासकीय निम शासकीय कार्यालयाची अभ्यासतांकडून संवाद साधताना जनतेपती अपेक्षित असणारी निकटता साधण्यात अडथळे येतात त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे औचित साधून शासकीय कार्यालयातील दूरध्वनीवरून होणारे संवाद व समोरासमोर आल्यानंतर होणाऱ्या संवादाची सुरुवात जर वंदे मातरम या अभिवादनाने केली तर संवादकर्त्यांमध्ये परस्परांप्रती एक आपुलकीची भावना निर्माण होऊन पुढील संवाद निश्चितच सकारात्मक होण्यास मदत होऊन त्यातून एक नवीन ऊर्जा मिळू शकेल तसेच हॅलो सारख्या निरर्थक शब्दाचा वापर थांबून राष्ट्रपती आदर व्यक्त करणाऱ्या एकसमान शब्दोचारांची सवय आपोआपच वृद्धिंगत होईल राज्यातील हा उपक्रम अन्य राज्या करता ही मार्गदर्शक ठरू शकेल.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे औचित्य साधून सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातील दूरध्वनीवरील संवादांची सुरुवात हॅलो ऐवजी वंदे मातरम या या अभिवादनाने करण्यात यावी असे आवाहन या परिपत्रकाद्वारे संबंधितास करण्यात येत आहे वंदे मातरम या अभिवादनाने दूरध्वनीवरील संवर्धनाची सुरुवात करणे बंधनकारक नसेल तरी या आव्हानास प्रतिसाद देऊन वंदे मातरम या अभिवादनाने दूरध्वनीवरील संवादाची सुरुवात स्वयंप्रेरणेने करण्याबाबत सर्व विभागांनी कार्यालय प्रमुख आणि त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहित करावे.

याबाबत सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे असतील:-

सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय शासन सहाय्यित अनुदानित अर्थसाहित व इतर स्वरूपाचे सहाय्य असणारी कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था शाळा महाविद्यालय व शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत सर्व प्रकल्प उपक्रम आस्थापना येथील कार्यालयांमधील दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर अभ्यास किंवा सहकारी यांनी संवाद साधल्यास हॅलो ऐवजी वंदे मातरम या अभिवादनाने सुरुवात करण्यात यावी तसेच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवर संवाद साधतानाही वंदे मातरम असे अभिवादन करण्यास सर्व संबंधितांना प्रोत्साहित करण्यात यावे.

कार्यालयात संस्थांमध्ये येणाऱ्या अभ्यासतानाही सार्वजनिक जीवनात वंदे मातरम ने अभिवादन करण्याबाबत जाणीव जागृती करावी.

ज्या ठिकाणी स्वयंचलित दूरध्वनी यंत्रणा अस्तित्वात आहे त्या ठिकाणी हा बदल करण्यात यावा.

विविध बैठकांमध्ये वक्त्यांनी सुरुवात करताना ती वंदे मातरम या शब्दांनी करावी यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे.

व्यापक जनसंपर्क असणाऱ्या यंत्रणांनी वंदे मातरम अभिवादनाचा अधिकारी वापर करावा उदाहरणार्थ राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानकावरील उद्घोषणांची सुरुवात अंगणवाडी आरोग्य सेविका यांच्याकडून विविध समाज घटकांची होणाऱ्या दैनंदिन संवादाची सुरुवात इत्यादी.

अभियानाचा प्रचार आणि प्रसिद्धी:-

वंदे मातरम अभिवादन अभियानासाठी वृत्तपत्रे वाहिन्या समाज माध्यमे इत्यादी मधून महासंचालक माहिती व जनसंपर्क संचालनालय यांनी माहिती प्रस्तुत करावी तसेच वंदे मातरम अभिवादन करण्याबाबत जाणव जागृती निर्माण करण्यासाठी दृकश्राव्य माध्यमातून प्रचार प्रसार करावा.


वंदे मातरम या अभिवादानात्मक शब्दांनी सर्वांनी संभाषण सभेत सुरुवात करण्यासाठी जाणीव जागृती व प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांनी विशेष अभियान राबवावे.

लघु चित्रपटांच्या माध्यमातून वंदे मातरम अभिवादना बाबत जाणीव जागृती करावी.

वंदे मातरम हे फक्त नारा किंवा अभिवादन नसून यामागील राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावा.

सर्व शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय शासकीय अनुदानित व विनाअनुदानित कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था विद्यापीठे शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम व आस्थापना यांना वंदे मातरम अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी करण्याचे आव्हान या परिपत्रकाद्वारे करण्यात येत आहे.




वरील शासन परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.