माहे ऑक्टोबर 2022 चे माहे नोव्हेंबर 2022 मध्ये देय होणारे वेतन निवृत्तीवेतन दिवाळीपूर्वी प्रदान करणेबाबत आजचा वित्त विभागाचा अधिकृत शासन आदेश.
✌आनंदाची बातमी! ✌
अखेर आज दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने माहे ऑक्टोबर 2022 चे माहे नोव्हेंबर 2022 मध्ये देय होणारे वेतन व निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय पुढीलप्रमाणे निर्गमित केला आहे.
दिवाळी सणाची सुरुवात यावर्षी दिनांक 22 ऑक्टोबर 2022 पासून होत आहे. राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्ती वेतनधारक यांना दिवाळी सण साजरा करताना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने माहे ऑक्टोबर 2022 चे माहेर नोव्हेंबर 2022 मध्ये देय होणारे वेतन निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयातील तरतूद शिथिल करून माहे ऑक्टोबर 2022 या महिन्याचे वेतन आणि निवृत्ती वेतनाचे प्रदान दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
या दृष्टीने मुंबई वित्तीय नियम 1959 मधील नियम 71 च्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कुशागार नियम 1968 च्या खंड एक मधील नियम क्रमांक 328 मधील तरतुदी देखील शिथिल करण्यात येत आहे.
वेतन देयकाचे प्रदान विहित कालावधीत होण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेतन देयके त्वरित कोषागार सादर करावीत.
सदर तरतुदी जिल्हा परिषद मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे अकृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयाचे अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना देखील लागू होतील.
संचालक लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय तसेच राज्यातील सर्व कोषाद्वारे व उपकोषाद्वारे यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्यात.
वरील प्रमाणे आवश्यक असे सुस्पष्ट निर्देश महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने संबंधितांना दिले असून त्यामुळे माहे ऑक्टोबर 2022 चे वेतन दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी होतील अशी एक आनंदाची बातमी आहे.
वरील महत्त्वपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments