विदर्भातील प्राथमिक शाळांना देखील दिवाळीच्या सुट्ट्या 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत - शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे आदेश.
बुलढाणा जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांनी दिवाळी सुट्ट्या वाढविल्या. आदेश पुढीलप्रमाणे.
दरवर्षी विदर्भातील शाळा 26 किंवा 27 जून रोजी सुरू होत असल्यामुळे दीपावलीच्या सुट्ट्या महाराष्ट्रातील इतर शाळांपेक्षा विदर्भातील शाळांना कमी असतात.
परंतु अकोला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिनांक 6 ऑक्टोबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार दीपावलीच्या सुट्ट्या 22 ऑक्टोबर 2022 ते सात नोव्हेंबर 2022 पर्यंत असतील असे स्पष्ट केले आहे.
सदर आदेशाला संदर्भ म्हणून माननीय शिक्षण संचालक माध्यमिक यांचे दिनांक 30 एप्रिल 2021 चे पत्र व माननीय शिक्षण आयुक्त यांचे प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबतचे दिनांक 1 ऑक्टोबर 2021 च्या पत्राचा संदर्भ दिला आहे.
व ह्या दीपावलीच्या वाढीव सुट्ट्या देऊन देखील वर्षभरातील एकूण कामाचे दिवस हे 230 एवढे भरत आहेत.
अर्थात शिक्षणाधिकारी प्राथमिक अकोला यांनी ज्या दोन पत्रांचा संदर्भ सदर सुट्ट्या वाढवण्याच्या आदेश यामध्ये दिला आहे त्या दोन आदेशांचा संदर्भ घेऊन विदर्भातील इतर जिल्ह्यात दीपावलीच्या सुट्ट्या ज्या 2 नोव्हेंबर 2022 पर्यंत आहेत त्या सात नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढवू शकतात.
शिक्षणाधिकारी प्राथमिक अकोला जिल्हा परिषद यांचे संपूर्ण सुट्ट्या वाढवण्याबद्दल चे पत्र पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments