DCPS योजनेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनातून कपात प्राप्त झाली रक्कम व शासनाचा देय हिस्सा NPS मध्ये वर्ग करण्याबाबत शिक्षण संचालनालयाचे पत्र

DCPS योजनेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनातून कपात प्राप्त झाली रक्कम व शासनाचा देय हिस्सा NPS मध्ये वर्ग करण्याबाबत शिक्षण संचालनालयाचे पत्र. 


 महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयातून निर्गमित दिनांक 17 ऑक्टोबर 2022 रोजी च्या विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर यांना परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजनेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतनातून कपात झालेली रक्कम व शासनाचा देय हिस्सा यांच्या हिशोबाच्या पावत्या देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे. 


या स्मरणपत्र नुसार राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेतून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करण्याची कार्यपद्धती शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 19 सप्टेंबर 2019 अन्वे विहित करण्यात आली आहे. 

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या सर्व जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन क्रमांक सुरू करणे नियमित कपात करणे कपात केलेली रक्कम संबंधिताच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन खात्यावर जमा करणे व चिठ्ठ्या वाटप करणे परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजनेचा हिशोब पूर्ण करून सदरची रक्कम संबंधिताच्या कायम निवृत्तीवेतन खात्यावर जमा करणे इत्यादी बाबींची कार्यवाही 31 मार्च 2022 पूर्वी करून या बाबींसाठी मंजूर असलेली तरतूद खर्च करणे बाबतच्या कार्यवाही बाबत वेळोवेळी क्षेत्रीय कार्यालयांना संदर्भीय पत्रा अन्वय कळवण्यात आलेले आहे. तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये वर्ग लेखाशीर्षामधील सण 2021 22 मधील मंजूर तरतूद 3000 270 कोटी असताना खर्च 40 कोटी झालेला आहे या बाबीसाठी शासनाने अर्थशासकीय पत्राद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे व सदरील हिशोब तात्काळ पूर्ण करणे बाबत कळविले आहे. 

तरी सदर खात्यावर वेतनातून कपात झालेल्या रकमा शासनाचा देय हिश्याची रक्कम जमा करून त्यांना पावती देण्याची कार्यवाही अद्या पूर्ण झालेली नाही. सदर कार्यवाही पूर्ण करण्याचे काम अग्रक्रमाने हाती घेऊन त्याचा अनुपालन अहवाल या कार्यालयात दिनांक 18 एप्रिल 2022 पूर्वी सादर करण्याबाबत आपणास कळविण्यात आले होते परंतु अद्याप अहवाल सादर झालेला नाही. 

शासनाच्या अशासकीय पत्रांवर परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेतील खाते उघडण्यापूर्वी त्यांच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेतील खात्याची विवरण पत्रात मार्च 2021 अखेर हिशोब पावती तात्काळ देण्यात यावी तसेच डीसीपीएस खात्यावरील जमा रक्कम एनपीएस खात्यावर वर्ग करण्याबाबतची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करून खालील प्रमाणे माहिती 22 सप्टेंबर 2022 पूर्वी सादर करण्यास आपणास कळविले होते. परंतु अद्याप आपल्या विभागाची माहिती संचालनालयास प्राप्त झालेली नाही अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्याची माहिती प्राप्त झालेली नाही. 

तरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांकरिता डीसीपीएस योजनेतून एनपीएस योजनेत वर्ग करण्यासाठी आवश्यक अनुदानाची माहिती खालील नमुन्यात दिनांक 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी संचालनालयास तात्काळ ई-मेल द्वारे सादर करावी. 


अकोला वाशिम नागपूर या जिल्ह्यांचे हिशोब पूर्ण झालेले नाही. तसेच वर्धा भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली अमरावती व बुलढाणा या जिल्ह्याचा युग पूर्ण होऊनही रक्कम NDSL ला वर्ग केलेला नाही. 



वरील प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे डी सी पी एस एन पी एस बाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.