जिल्हा परिषद शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली 2022 बाबत अतिशय महत्त्वाची माहिती शासन निर्णयानुसार.
बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.
बदली वर्ष 2022:-
सर्वसाधारणपणे बदली वर्ष हे ३० मे पर्यंत धरण्यात येते परंतु ४ मे २०२२ रोजी काढलेल्या पत्रानुसार यावर्षी हे बदली वर्ष ३० जून पर्यंत वाढविण्यात आलेले आहे.
बदलीसाठी धरावयाची सेवा :-
अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक ३० जून पर्यंत झालेली एकूण सेवा.
सक्षम अधिकारी :-
शिक्षकांच्या बदल्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम अधिकारी राहील.
बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक :-
ज्या शिक्षकांची शाळा अवघड क्षेत्र मध्ये असेल व एकूण सेवा 3 वर्षे झालेली असेल असे शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक असतील.
बदली पात्र शिक्षक :-
सर्वसाधारण क्षेत्र +अवघड क्षेत्र+ कार्यरत जिल्ह्यात सलग सेवा १० वर्ष पूर्ण + विदयमान शाळेत सेवा ५ वर्ष पूर्ण बदली पात्र शिक्षक.
कार्यरत जिल्ह्यात सलग सेवा १० वर्ष पूर्ण विदयमान शाळेत सेवा ५ वर्ष पूर्ण.
संवर्ग निहाय शिक्षकांना किती शाळा भरता येणार तसेच बदली कशी होणार याची माहिती खाली दिलेली आहे.
विशेष संवर्ग भाग 1 :
पसंतीक्रम : विशेष संवर्ग भाग १
शासन निर्णयात नमूद प्राधान्य क्रम, सेवाज्येष्ठता, जन्मतारीख, आडनावातील पहिले इंग्रजी वर्णश्वर यानुसार प्राधान्य दिले जाईल.
सिस्टमद्वारे बदली प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा सुधारित रिक्त पदांची यादी जाहीर केली जाईल.
शिक्षकांना त्यांचा विनंतीवरूनच बदली देण्यात येईल.
या अंतर्गत शिक्षकांची बदली बदलीपात्र शिक्षकांच्या जागी होईल.
विशेष संवर्ग 2 :-
विशेष संवर्ग भाग २ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम देण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देण्यात येईल.
कमीतकमी १ शाळा व जास्तीत जास्त ३० शाळांचे पसंतीक्रम देणे आवश्यक आहे.
पती पत्नी दोघे ही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करू शकतो.
बदली अधिकार प्राप्त शिक्षक ( संवर्ग 3 )
बदली अधिकार पात्र शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम देण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देण्यात येईल.
३० शाळांचा पसंतीक्रम देणे आवश्यक आहे.
बदलीपात्र शिक्षक ( संवर्ग 4 )
पसंतीक्रम : बदलीपात्र
सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करून, बाकी सर्व शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देण्यात येईल.
सेवाज्येष्ठता, जन्मतारीख, आडनावाती पहिले इंग्रजी वर्णाक्षर यानुसार प्राधान्य देऊन पसंतीप्रमाणे बदली होईल.
विस्थापित शिक्षक :-
पसंतीक्रम : विस्थापित शिक्षक
सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करून, उरलेल्या सर्व शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी / बदलण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देण्यात येईल.
या शिक्षकांनी ३० अथवा रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य आहे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
2 Comments
Shaley kamgar mandhan wad kevha hoil
ReplyDeleteशासन स्तरावर पाठपुरावा करावा
Delete