विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनासाठी (Career Guidance) आयोजित वेबिनार बाबत एमएससीईआरटी(MSCERT) चे पत्र.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे चे सहसंचालक माननीय रमाकांत कोठमोरे यांचे स्वाक्षरीने दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोजी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित विबिनारबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्याच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे उद्याचे सुजन नागरिक म्हणून राज्याच्या देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देत असतात. राज्यातील इयत्ता नववी ते इयत्ता बारावीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण व सोबतच भविष्यातील करिअरच्या विविध संधी आव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी परिषदेमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते या अंतर्गत करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी विबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर विबिनारचे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयाच्या यूट्यूब चैनल वरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
सेवा क्षेत्रातील करियर बाबत दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी तीन ते चार या वेळात पुढील लिंक वर वेबिनार आयोजित केला आहे.
प्रसार माध्यम क्षेत्रातील करियर यासंदर्भात मार्गदर्शनासाठी दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी तीन ते चार या वेळात पुढील लिंक वर वेबिनार आयोजित केला आहे.
संगणक क्षेत्रातील करियर मार्गदर्शनासाठी दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी तीन ते चार या वेळात पुढील लिंक वर वेबिनार आयोजित केला आहे.
आर्थिक क्षेत्रातील करियर मार्गदर्शनासाठी दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी तीन ते चार या वेळात पुढील लिंक वर वेबिनार आयोजित केला आहे.
शिक्षण क्षेत्रातील करियर मार्गदर्शनासाठी दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी तीन ते चार या वेळात पुढील लिंक वर वेबिनार आयोजित केला आहे.
वरील सर्व युट्युब लिंक वर क्लिक करून आपण त्याच्या दिवशीच्या वेबिनार ला जॉईन होऊ शकता.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments