आधार नोंदणी दुरुस्ती बाबत मार्गदर्शक सूचना.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ई गव्हर्नन्स अंतर्गत एन आय सी पुणे कडून विकसित करण्यात आलेल्या सरळ पोर्टल वर पहिली ते बारावी मधील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळेमधील प्रत्येक विद्यार्थ्याच्या आधार क्रमांक ची नोंद संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत करावयाची आहे. राज्यात याबाबत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक ची नोंद अद्याप बाकी असून ज्या काही विद्यार्थ्यांची नोंद झाल्या आहेत त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात त्रुटी आढळल्या आहेत.
तरी यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करून आपल्या जिल्ह्यामध्ये या प्रकारे कार्यक्रम राबवून दिनांक 30 सप्टेंबर 2022 पर्यंत शंभर टक्के आधार नोंदणी कशी पूर्ण व अचूक होईल याची दक्षता घ्यावी.
आधार नोंदणी.
या कामी माननीय जिल्हाधिकारी यांना विनंती करून त्यांच्याकडून प्रत्येक तालुक्यास किमान दोन आधारकीट ऑपरेटर्सह उपलब्ध करून घ्यावेत तसेच आधार कॅम्पस देखील आयोजित करावेत.
शाळेच्या जनरल रजिस्टर द्वारे विद्यार्थ्याचे नाव जन्मतारीख व लिंग आणि स्टुडन्ट पोर्टल मध्ये विद्यार्थ्यांचे नमूद केलेले नाव जन्मतारीख वलिंग हे आधार कार्ड वरील उल्लेखित माहिती सुसंगत असल्याची खात्री करावी जिथे आधार अपडेट करावयाचे विद्यार्थी जास्त आहेत तिथे गटशिक्षणाधिकारी यांनी ऑपरेटर च्या कामाचे नियोजन करावे. आपल्या जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी आढावा बैठकीतून सरल पोर्टलवर आधार अपडेट साठी शाळेच्या स्तरावर मुख्याध्यापक यांना सूचना व मार्गदर्शन देण्याबाबत विनंती करावी.
आधारची माहिती ऑफलाईन बल्क मध्ये नोंदवून नंतर ऑनलाईन नोंदवण्यापेक्षा विद्यार्थिनी हाय स्वतंत्रपणे नोंदवावी की ज्यामुळे आधार नोंदणीची पुनरावृत्ती होणार नाही.
सदर कामी आपलेकडील एम आय एस कॉर्डिनेटर डाटा ऑपरेटर विषय तज्ञ साधन व्यक्ती विषय तज्ञ डाटा ऑपरेटर फिरते विशेष शिक्षक यांना प्रत्येकी किमान शंभर विद्यार्थ्यांची जबाबदारी सोपवण्यात यावी तसेच या सर्वांचे शाळा भेटीच्या वेळापत्रकाची नियोजन करून नियोजित शाळेच्या मुख्याध्यापकांची युजर आयडी व पासवर्ड घेऊन आधार नोंदणीच्या कामास सुरुवात करावी व त्यांचे कामावर नियंत्रण व पर्यावेक्षण करण्याचे काम संबंधित तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात यावे तसेच त्यांनी देखील स्वतः शाळा भेटी देण्याची नियोजन करावे. त्यांची नियोजन शिक्षण अधिकारी यांनी नियंत्रण करावे.
या कामाच्या प्रगतीचा आपण आढावा घेऊन दर सोमवारी त्यांचा अहवाल संचालनालयास न चुकता सादर करावा.
आधार क्रमांकाच्या दुरुस्ती करणेबाबत.
शाळेच्या जनरल रजिस्टर द्वारे स्टुडन्ट पोर्टल मध्ये विद्यार्थ्यांचे नाव जन्मतारीख व लिंग आधार कार्डवर उल्लेखित माहितीशी सुसंगत नसल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची संपर्क साधून तातडीची दुरुस्ती करावी आधार कॅम्पस मध्ये याबाबत जागरूकतेने कार्यवाही करावी.
आधार कार्ड वरील माहिती दुरुस्त करावयाची असल्यास आधार कॅम्पची मदत घेण्यात यावी दुरुस्त केलेल्या माहितीनुसार आधार क्रमांकाचा तपशील स्टुडन्ट पोर्टलमध्ये अद्यावत करण्यात यावा.
स्टुडन्ट पोर्टलमध्ये एकाच विद्यार्थ्याचे नाव एकापेक्षा अधिक वेळा नमूद केल्याची खात्री करावी.
अशाप्रकारे संपूर्ण कामाचा निघताना दिनांक 30 सप्टेंबर 2022 पर्यंत शंभर टक्के पूर्ण करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments