तिसऱ्या अपत्य (आपत्य) संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय.
भारताचे संविधान..
महाराष्ट्र शासन राजपत्र एप्रिल 28 2005 वैशाख 8 शके 1927
भारताची संविधानातील अनुच्छेद 309 च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे शासकीय विभागातील गट अ ब क आणि ड मधील पदांच्या सेवा प्रवेशासाठी एक आवश्यकता म्हणून लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन विहित करणारे पुढील नियम करीत आहे.
1. संक्षिप्त नाव- या नियमांना महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम 2005 असे म्हणावे.
2. व्याख्या:- या नियमांमध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर.
प्रतिज्ञापन याचा अर्थ शासकीय सेवेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने द्यावयाची प्रतिज्ञापन असा आहे.
शासन याचा अर्थ महाराष्ट्र शासन असा आहे.
सेवा याचा अर्थ महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणाखालील नागरी सेवा किंवा इतर कोणतीही सेवा असा आहे.
लहान कुटुंब याचा अर्थ दोन मुले यांच्यासह पत्नी व पती असा आहे.
स्पष्टीकरण:- या खंडाचे प्रयोजनार्थ..
एखाद्या जोडप्यास हे नियम अमलात येण्याच्या दिनांक ला किंवा त्यानंतर केवळ एकच मूल असेल त्या बाबतीत नंतरच्या एकाच प्रस्तुतीत जन्मलेल्या कोणत्याही एकापेक्षा अधिक मुलांना एकच अपत्य म्हणून समजण्यात येईल.
मुल यामध्ये दत्तक मुलाचा किंवा मुलांचा समावेश होत नाही.
या नियमांमध्ये वापरण्यात आलेली परंतु व्याख्यान केलेल्या शब्द व शब्दप्रयोग यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियमांमध्ये अनुक्रमे जे अर्थ नेमून दिलेले असतील तेच अर्थ असतील.
लहान कुटुंबांच्या प्रतिज्ञापनाची आवश्यकता:- शासकीय सेवेतील गट अ ब क किंवा ड मधील पद भरती चे विनियमन करण्याच्या बाबतीत करण्यात आलेले कोणतेही नियम किंवा आदेश किंवा विलेख किंवा त्याबाबत करण्यात आलेली तर कोणतेही आदेश किंवा विलेख यामध्ये काहीही अंतर्भूत केलेले असले तरी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन ही कोणत्याही शासकीय सेवेतील गट अ ब क ड मधील पदाच्या नियुक्तीसाठी एक अतिरिक्त आवश्यक अट असेल.
परंतु हे नियम अमलात येण्याच्या दिनांकास दोन पेक्षा अधिक मुले असणाऱ्या व्यक्तीस अशा अंमलबजावणीच्या दिनांक असलेल्या तिच्या मुलांच्या संख्येत जोपर्यंत वाढ होत नाही तोपर्यंत या खंडाखाली नियुक्तीसाठी अनर्ह ठरवण्यात येणार नाही.
परंतु आणखी असे की हे नियम अमलात येण्याच्या दिनांकापासून एका वर्षाच्या कालावधीत एकाच प्रसूतीमध्ये जन्मलेले मुल किंवा एकापेक्षा अधिक मुद्दे या खंडात नमूद केलेल्या अनर्ह टेच्या प्रयोजनासाठी विचारात घेण्यात येणार नाही.
प्रतिज्ञापन सादर करणे. शासकीय सेवेतील गट अ ब क किंवा ड मधील कोणत्याही पदासाठी अर्ज करण्याची इच्छा असेल कोणतीही व्यक्ती कर्ज सोबत या नियमातील नमुना मधील प्रतिज्ञापन सादर करील.
नियम लागू नसणे:- जेथे निवड प्रक्रिया हे नियम अमलात येण्याच्या दिनांक पूर्वीच सुरू झाली असेल त्या बाबतीत हे नियम लागू करण्यात येणार नाही.
या नियमांच्या तरतुदी शिथिल करण्याचा अधिकार:- या नियमांमध्ये काहीही अंतर्भूत केले असले तरी शासनाच्या न्याय आणि संयुक्तिक वाटेल अशा परिस्थितीत आणि अशा रीतीने शेतीतील तिची कारणे लेखी नोंदवून या नियमातील कोणत्याही तरतुदी शिथिल करता येतील.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments