शिक्षण विभागातील पदभरती संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय

शिक्षण विभागातील पदभरती संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय. 

शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार का? 

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी एका अधिष्ठान्वये महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे अस अर्थव्यवस्थेवरील परिणामांबाबत वित्तीय उपाययोजना करण्याअंतर्गत घातलेली पदभरती बंदी बाबत पुढील प्रमाणे माहिती मागविली आहे. 

पद भरती वर घातलेल्या बंदी मुळे वित्त विभागाने काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत याचे स्पष्टीकरण व माहिती शासनास तात्काळ सादर करावयाचे निर्देश दिले आहेत. 

दिनांक 28 ऑगस्ट 2015 च्या शासन निर्णयानुसार जिल्हा निहाय विद्यार्थी संख्या तसेच संचमान्यतेनुसार मंजूर शिक्षक शिक्षकेतर पदे भरलेली पदे व रिक्त पदे यांची माहिती द्यावी. 

जिल्हा न्याय अतिरिक्त शिक्षक असतील तर त्या शिक्षकांची माहिती द्यावी अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत काय कार्यवाही केली आहे. 

शासन निर्णय दिनांक 28 ऑगस्ट 2005 नुसार संच मान्यतेनुसार शिक्षक पदांची मागणी केली आहे किंवा कसे? 

राज्यात शून्य ते वीस संख्या असलेले शाळा किती आहेत सदर शाळा बंद करणे बाबत विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर सुरू आहे. 

विभागांनी 67,755 रिक्त पदे भरण्याची विनंती केली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात पदी भरली गेल्यास राज्य शासनावर खूप मोठा आर्थिक भार येणार आहे. 

राज्य शासनाच्या एकूण खर्चांपैकी सुमारे 18 टक्के निधी शालेय शिक्षण विभागावर खर्च होतो.  त्यातही महसुली खर्च पैकी मोठ्या प्रमाणात निधी हा वेतनावर खर्च होत आहे. 


शालेय शिक्षण वकील विभागाला जर पद भरती करायची असेल तर सर्व मुद्द्यांची सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरण शासनाला सादर करावे लागेल व ते करूनही शासन शासनावर आर्थिक भार येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकर भरती करणार नाही हे मात्र निश्चित असे या परिपत्रकावरून आपल्या लक्षात येते. 


शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार का? 

वरील परिपत्रकात 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबत शिक्षण विभागाने काय कार्यवाही केली हा देखील प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे या शाळा बंद होणार का हा प्रश्न देखील आपल्यासमोर येतो. 



 


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏







Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.