शिक्षण सेवक, ग्रामसेवक, कृषी सेवक, आरोग्य सेवक यांच्या मानधनात वाढीवर आज निर्णय होणार होणार..
महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मत्स्यव्यवसाय विभागाने दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी निगमित केलेल्या परिपत्रकानुसार कृषी सेवक ग्रामसेवक शिक्षण सेवक आणि आरोग्य सेवकांच्या मानधनात वाढ करणे बाबत माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी अकरा वाजता आयोजित केली आहे.
या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, अप्पर मुख्य सचिव ग्रामविकास विभाग, अप्पर सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग व सचिव शालेय शिक्षण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग.
वरील संबंधित विभागाचे सचिव उपस्थित राहणार आहेत. सदर बैठकीत तीन ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ती पुढे ढकलण्यात येऊन ती दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे.
शिक्षण सेवक हे पद 2003 पासून सुरू झाले त्यावेळी शिक्षण सेवकाला तीन हजार रुपये मानधन दिले जायचे. यानंतर 2012 पासून हे मानधन वाढवून सहा हजार रुपये करण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ झालेली नाही ही मानधन वाढ या बैठकी वर अवलंबून असणार आहे.
या अगोदर तीन हजार रुपयांवरून सहा हजार रुपये एवढ मानधन वाढवण्यात आले होते. आता ते 6000 रुपयांवरून 12000 रुपये होईल अशी अपेक्षा आहे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments