शालार्थ वेतन प्रणाली मध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बँक खाते क्रमांक तपशील पडताळणी करणे बाबत शिक्षण संचालकांचे परिपत्रक

शालार्थ वेतन प्रणाली मध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बँक खाते क्रमांक तपशील पडताळणी करणे बाबत शिक्षण संचालकांचे परिपत्रक.


शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक या कार्यालयाच्या 27 सप्टेंबर 2022 रोजीच्या परिपत्रकां अन्वय माननीय शिक्षण संचालक महेश पालकर यांनी शालार्थ वेतन प्रणाली मध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बँक खाते क्रमांक तपशील पडताळणी करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षण इतर कर्मचारी यांचे दरमहा एक तारखेला वेतन होण्यासाठी एसबीआय सीएमपी प्रणाली शालार्थ वेतन प्रणाली सोबत इंटिग्रेट केली असून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अचूकपणे त्यांचे बँक खात्यावर जमा होण्यासाठी सर्व संबंधित कार्यरत कर्मचाऱ्यांचे वयक्तिक बँक खाते क्रमांक शालार्थ प्रणाली मध्ये पडताळणी अर्थात व्हेरिफाय करणे आवश्यक आहे त्यासाठी सुविधा शालार्थ प्रणाली मध्ये विकसित केली असून शाळेच्या म्हणजेच लॉगिन वरून सर्व कर्मचाऱ्यांची बँक खाते क्रमांक पडताळणी म्हणजेच व्हेरिफाय करणे बाबत संबंधित सर्व मुख्याध्यापक यांना सूचना देण्यात याव्यात.

शाळेच्या लॉगिन वरून रिपोर्ट मधून बँक स्टेटमेंट ची प्रिंट काढून त्यावरील बँक खाते क्रमांक अचूक असल्याची खात्री करण्यासाठी सदर बँक खाते क्रमांक सर्व कर्मचाऱ्यांचे निदर्शनास आणून सदर बँक खाते क्रमांक अचूक असल्याचे त्यावर कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी घेऊन दप्तरी जतन करून ठेवावे व शालार्थ प्रणाली मध्ये खालील पाच वर कर्मचाऱ्यांचे बँक खाते क्रमांक व्हेरिफाय करावे.

Path:Current Path:Worklist>Payroll>CMP_BANK_DETAILS>Verify Bank Details For CMP Employee. 

तसेच बँक कर्मचाऱ्यांची खाते क्रमांक चुकीचे व्हेरिफाय केल्यास त्यामधील दुरुस्ती किंवा अद्यावत करण्याबाबतचा पाठ खालील प्रमाणे.

Path:Current Path:Worklist>Payroll>CMP_BANK_DETAILS>Update Bank Details For CMP Employee. 

एकदा कर्मचाऱ्यांचे बँक खाते क्रमांक व्हेरीफाय झाल्यानंतर ते शालार्थ प्रणालीमध्ये फ्रिज होतील त्यामध्ये बदल कन्याचा झाल्यास डीडीओ टू कडे विनंती पाठवावी लागेल त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे बँक खाते क्रमांक अचूकपणे मुख्याध्यापकांच्या देखरेखी खाली व्हेरिफाय करावे सदर कार्यवाही 30 सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण करावी. माहे ऑक्टोबर २०२२ च्या देयकांसोबत सर्व कर्मचाऱ्यांची वैयक्तिक खाते क्रमांक अचूक व्हेरिफाय केल्याचे तसेच बँक स्टेटमेंट वरील कर्मचाऱ्यांचे बँक खाते क्रमांक व बँकेचा आयएफएससी कोड अचूक असल्याचे प्रमाणपत्र मुख्याध्यापक यांनी बँक स्टेटमेंट वर नमूद करून स्वाक्षरी करून त्याची प्रत देखा सोबत वेतन पथक कार्यालयास सादर करावे. त्याचबरोबर मुख्याध्यापकांची संयुक्त बँक खाते अचूक असल्याचे संबंधित मुख्याध्यापक व वेतन पद्धत यांनी खात्री करावी.

बँक खाते क्रमांक शालार्थ प्रणालीमध्ये चुकीचे विकार केल्यास सदर कर्मचाऱ्यांचे वेतन इतर व्यक्तीच्या खात्यावर जाऊ शकते त्यामुळे काळजीपूर्वक शिक्षक शिक्षक पेपर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक बँक खाते क्रमांक व्हेरिफाय करावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास तात्काळ सादर करावा.

वरील प्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना माननीय शिक्षण संचालक यांनी सदर परिपत्रकां अन्वय सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई, तसेच अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक व माध्यमिक सर्व यांना दिले आहेत.



 वरील शिक्षण संचालक माध्यमिक यांचे वेतना संदर्भातील महत्त्वपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.