सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक महत्त्वाचे शासन निर्णय/ परिपत्रके/अधिसूचना यांचे संकलन.
शासन सेवेत पदस्थापने पासून राजीनामा पर्यंत सर्व टप्प्यांवर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रकरणे हाताळताना प्रचलित शासन निर्णय परिपत्रके अधिसूचना अधिनियम यांच्या आवश्यकता भासते. सर्व प्रशासकीय विभागांना सेवाविषयक प्रकरणे हाताळताना त्यांचा अभ्यास करताना व ते सादर करताना आवश्यक असलेल्या सर्व सेवा विषयक शासन निर्णय परिपत्रके अधिसूचना यांचे नऊ खंडातील संकलन सामान्य प्रशासन विभागाच्या संकेतस्थळावर सेवाविषयक शासन निर्णय या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आले आहे.
तथापि त्याची व्याप्ती मोठी असल्याने ते छापील प्रतीच्या स्वरूपात कार्यसनात ठेवणे जागा व्यापणारे आहे.
त्यामुळे वेळोवेळी लागणारे अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय परिपत्रके अधिसूचना एकत्रितरीत्या छापील स्वरूपात देखील सहज उपलब्ध व्हावेत या हेतूने एक वेगळे संकलन करण्याची गरज निर्माण झाली. त्यातूनच प्रस्तुत संकलन तयार करण्यात आले आहे या पुस्तकाद्वारे नेहमी लागणारे अत्यंत महत्त्वाचे सेवाविषयक शासन निर्णय परिपत्रके अधिसूचना एकत्रितरित्या उपलब्ध झाल्याने हे पुस्तक सेवाविषयक बाबींशी संबंधित मंत्रालय विभागातील तसेच क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांना सेवाविषयक प्रकरणे हाताळताना अत्यंत उपयोगी ठरेल.
तसेच सेवाविषयक प्रस्ताव परिपूर्ण सादर करता यावा या दृष्टीने सामान्य प्रशासन विभागाच्या हत्यार येथील वेगवेगळ्या सेवाविषयक बाबींची तपासणी सूची पुस्तिका महाराष्ट्र शासनाच्या.
https://gad.maharashtra.gov.in/
वरील संकेतस्थळावर सेवा विषयक प्रस्तावासाठी तपासणीची पुस्तिका या शीर्षकाखाली उपलब्ध करण्यात आली आहे विविध प्रकारचे सेवाविषयक प्रस्ताव सामान्य प्रशासनाकडे विभागाकडे सादर करताना या तपासणी सूचीमध्ये नमूद असलेल्या प्रत्येक मुद्द्याची तपासणी करून त्या कुष्ठार्थ आवश्यक कागदपत्रासह संपूर्ण प्रस्ताव सादर करावा जेणेकरून प्रकरणी लवकरात लवकर निकाली काढणे शक्य होईल.
सदर पुस्तकाचे संकलन संपादन व रचना करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागातील कार्यसन बाराशे सहसचिव राजेंद्र सुर्वे खबर सचिव श्री एका गार्गी कक्षा अधिकारी श्री दीपक मोरे श्रीमती माधवी शिंदे आणि कार्यासनामधील कर्मचारी बुरुंद यांनी पुढाकार व परिश्रम घेतले आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवा विषयक महत्त्वाचे शासन निर्णय परिपत्रके अधिसूचना अधिनियम यांचे संकलन पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
वरील संकलन सूचीतील आपल्याला आवश्यक असलेला शासन आदेश अधिनियम अधिसूचना परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकृत.
https://gad.maharashtra.gov.in/
या संकेतस्थळाला भेट द्या व गरजेप्रमाणे शासन निर्णय परिपत्रक अधिनियम आदेश डाऊनलोड करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments