महिला कर्मचाऱ्यांना कोणत्या सवलती देण्यात याव्यात याबद्दल शासन निर्णय.

 महिला कर्मचाऱ्यांना कोणत्या सवलती देण्यात याव्यात याबद्दल महत्वपूर्ण शासन निर्णय.


महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक सात मार्च 2008 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेनंतर थांबवणे आणि सुट्टीच्या दिवशी बोलावणे टाळणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


शासकीय कर्मचाऱ्यांना विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेनंतर कार्यालयात उशिरा थांबू नये आणि रविवार व सुट्टीच्या दिवशी शक्यतो कामावर बोलू नये यासंबंधी वेळोवेळी आदेश निर्गमित केले आहेत.


शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की तातडीचे काम किंवा विधिमंडळाच्या अधिवेशन कालावधीत मंत्रालय विभाग किंवा शासकीय कार्यालयांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना संध्याकाळी कार्यालयीन वेळेनंतर बराच वेळ उशिरा थांबवण्यात येते. तसेच रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी महिला कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्यात येते. याबाबत वरील आदेशानुसार काढण्यात आलेल्या आदेशांचे एकत्रीकरण करून सर्व मंत्रालयीन विभागांना पुन्हा सुचित करण्यात येते की शासकीय महिला कर्मचाऱ्यांना शक्यतो नशिरा थांबू नये परंतु तातडीचे काम किंवा विधिमंडळ अधिवेशन कालावधी मध्ये थांबविणे अनिवार्य असल्यास ज्या महिला कर्मचाऱ्यांना संध्याकाळी साडेसहा वाजेनंतर उशिरापर्यंत थांबवले असेल त्यांना संबंधित विभागाने नजीकच्या रेल्वे स्टेशनवर जबाबदारीने सोडवण्याची व्यवस्था करावी. तसेच रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी कामावर बोलवणे आवश्यक वाटल्यास विभागाच्या कार्यालय प्रमुख आजच्या अनुमतीनेच त्यांना त्या दिवशी कार्यालयात बोलवण्यात यावे. वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

असे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 7 मार्च 2008 रोजी खालील शासन परिपत्रकानुसार दिले आहेत.


वरील महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.