जिल्हांतर्गत बदली 22 शिक्षक माहिती दुरुस्ती बाबत मार्गदर्शक सुचना.
आज दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांनी जिल्हा अंतर्गत बदली 2022 शिक्षक माहिती दुरुस्तीबाबत आवश्यक सूचना देणे बाबत पुढील प्रमाणे सूचना निर्गमित केल्या आहेत.
सदर पत्रानुसार विन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शिक्षकांच्या बदल्या संदर्भात अजून माहिती मागविली आहे सदर माहिती सादर केल्याशिवाय जिल्हा अंतर्गत बदल्या सुरू होणार नाहीत त्यासाठी वाट पाहावी लागेल असे समजते.
शिक्षकांच्या साठी महत्त्वाचे.
जिल्हांतर्गत बदलीसाठी आवश्यक शिक्षक माहिती प्रोफाइल डाटा यापूर्वी शिक्षकांनी तपासून विन्सेस या सॉफ्टवेअर कंपनीकडे पाठवला होता लवकरच जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे सदर माहिती मधील मुद्दा क्रमांक एक ते चार मध्ये ज्या शिक्षकांच्या माहिती दुरुस्ती असेल अशा शिक्षकांची व मुद्दा क्रमांक पाच करंट एरिया जॉइनिंग डेट इन करंट डिस्ट्रिक्ट सध्याच्या क्षेत्रातील रुजू दिनांक या रकाण्यातील सर्व शिक्षकांची .माहिती आवश्यक आहे त्यामुळे सोबत पाठवलेल्या पीडीएफ फाईल मधील सर्व शिक्षकांनी खालील नमूद एक ते चार मुद्दे काळजीपूर्वक तपासून त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास दिलेल्या नमुन्यात माहिती सादर करावी दुरुस्ती नसल्यास निरंक असे लिहावे व मुद्दा क्रमांक पाच ची माहिती नोंद करावी सदरची माहिती मंगळवार दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत केंद्रप्रमुख यांच्याकडे पाठवावी.
1) करंट डिस्टिक जॉइनिंग डेट - सध्या कार्यरत असलेल्या जिल्ह्याचा रुजू दिनांक यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शिक्षकांनी शाळा निहाय संकलित दुरुस्ती अहवाल कॉलम नंबर चार मध्ये लिहावी.
2) करंट स्कूल जॉइनिंग डेट- सध्या कार्यरत असलेल्या शाळेचा रुजू दिनांक यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शिक्षकांनी शाळा निहाय संकलित दुरुस्ती अहवाल कॉलम नंबर पाच मध्ये लिहावी.
3) टीचर टाईप - शिक्षक प्रकार
यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शिक्षकांनी शाळा निहाय दुरुस्ती अहवाल कॉलम नंबर सहा मध्ये लिहावी.
4)टीचिंग सब्जेक्ट टाईप. यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शिक्षकांनी शाळांनी हा संकलित दुरुस्ती अहवाल कॉलम नंबर सात मध्ये लिहावी.
5) करंट एरिया जॉइनिंग डेट इन करंट डिस्टिक - क्षेत्रातील रुजू दिनांक सदरची माहिती पीडीएफ फाईल मधील सर्व शिक्षकांनी शाळा नहाय संकलित दुरुस्ती अहवाल कॉलम नंबर आठ मध्ये लिहावी.
केंद्रप्रमुखांनी सर्व शाळांकडून प्राप्त झालेली मुद्दा क्रमांक एक ते पाच ची माहिती शिक्षण विभाग पंचायत समिती यांच्याकडे बुधवार दिनांक 14 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी बारा वाजापूर्वी द्यावी पंचायत समिती यांच्याकडे माहिती सादर करण्यापूर्वी पीडीएफ फाईल मधील सर्व शिक्षकांची माहित प्राप्त झाल्याची खात्री करावी.
गटशिक्षणाधिकारी यांनी केंद्रप्रमुख यांच्याकडून प्राप्त माहिती संकलित करून केवळ दुरुस्ती असलेल्या कर्मचाऱ्यांचीच माहिती दिलेल्या नमुन्यात सादर करावी सर्वांची माहिती त्या नमन्यात घेऊ नये.
पीडीएफ फाईल मध्ये ज्या शिक्षकांची नावे नाहीत त्यांची नावे ॲड करू नयेत कारण कोर्ट केस मुख्याध्यापक ऑगस्ट 2022 पर्यंत सेवा निवृत्त झालेले शिक्षक शिक्षण सेवक नियमित शिक्षक यांना बदली प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे.
30 सप्टेंबरला सेवानिवृत्त होणारे शिक्षक मयत झालेले शिक्षक विलंबित झालेली शिक्षक यादीत असल्यास दिलेल्या मुळ्यामध्येच डिलीट करावयाचे शिक्षक म्हणून स्वतंत्र माहिती द्यावी ते मार्क या कॉलम मध्ये डिलीट करावयाचे नमूद करावे.
गटशिक्षणाधिकारी आणि उपरोक्त माहिती दिनांक 16 सप्टेंबर 2022 ला दुपारी 12 पूर्वी जिल्हा बदली नियंत्रण कक्ष शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा येथे सादर करावे.
मुद्दा क्रमांक पाच करंट एरिया जॉइनिंग डेट इन करंट डिस्टिक म्हणजे 2017 च्या सर्वसाधारण अवघड क्षेत्रानुसार सध्याची शाळा ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात कधीपासून आहात ती तारीख कॉलम नंबर आठ मध्ये नोंद करावी.
बदली संदर्भात माहिती देत असताना काळजीपूर्वक द्यावी. आपल्या चुकीच्या माहितीमुळे बदली प्रक्रियेत काही अडचण समस्या निर्माण झाल्यास ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार संबंधित शिक्षकावर कार्यवाही होऊ शकते.
वरील शिक्षण अधिकारी बुलढाणा यांचे संपूर्ण पत्र पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments