वरिष्ठ वेतनश्रेणी की एक स्तर वेतनश्रेणी की एक स्तर वेतनश्रेणीवर वरिष्ठ वेतन श्रेणी? ग्रामविकास विभागाचे पत्र

वरिष्ठ वेतनश्रेणी की एक स्तर वेतनश्रेणी की एक स्तर वेतनश्रेणीवर वरिष्ठ वेतन श्रेणी? ग्रामविकास विभागाचे पत्र.


महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 3 ऑगस्ट 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना उद्देशून निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार आदिवासी क्षेत्रात कार्यरत असल्याने एक स्तरचा लाभ मिळणे बाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल याची किंमत आहे मार्गदर्शन मिळणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


आदिवासी भागात कार्यरत प्राथमिक शिक्षक यांना बारा वर्षानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करण्यात आलेल्या प्राथमिक शिक्षकांना माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने व शासन निर्णय दिनांक 6 ऑगस्ट 2022 च्या तरतुदीनुसार पूर्ण एकत्र योजनेचा लाभ मंजूर करता येणार नाही अशी या कार्यालयाची धारणा असून धरणा पक्की करण्यात येऊन सदर बाबी बाबत शासन स्तरावरून मार्गदर्शन करण्यात यावे अशी विनंती केली आहे.

दिनांक सहा ऑगस्ट 2002 च्या शासन निर्णयात खालील प्रमाणे तरतुदी आहे.

सर्व पदांसाठी एक स्तर पदोन्नती.

आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून गट अ ते ड मधील सर्व पद धारकांना संबंधित कर्मचारी अधिकारी त्या क्षेत्रात कार्यरत असेपर्यंतच्या काळात त्यांनी केलेल्या मूळ पदाच्या नजीकची वरिष्ठ पदोन्नतीची वेतनश्रेणी व त्या अनुषंगाने वेतन निश्चितीचा लाभ देण्यात यावा ज्या कर्मचारी अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे त्यांना आणखी वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय नसेल.

वरील तरतूद पाहता आदिवासी क्षेत्रात कार्यरत असताना बारा वर्षाच्या सेवेनंतर चटपवाद्या वेतनश्रेणी देण्यास पात्र ठरल्यास अशा प्रकरणी एक स्तर पदाची पदोन्नतीची वेतनश्रेणी काढून घेऊन चटोपाध्याय प्रमाणे वेतन देण्यात यावे अशी तरतूद दिसून येत नाही

त्यामुळे आपल्या कार्यालयामार्फत आदिवासी क्षेत्रात कार्यरत शिक्षकांची एक स्तर वेतनश्रेणी काढून घेऊन त्यांना चटोपाध्याय योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही ज्या शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे त्या शासन निर्णयाची प्रत शासनास तात्काळ उपलब्ध करून द्यावी तदनंतरच सदर प्रकरणी शासनास मार्गदर्शन देणे शक्य होईल.

अशी सूचना ग्रामविकास विभागाचे उपसचिव माननीय का गोवळवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना केल्या आहे.



 वरील ग्राम विकास विभागाचे परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏




Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.