15 ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणे बाबत शासन परिपत्रक

 15 ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणे बाबत शासन परिपत्रक.


(Doctor A P J Abdul Kalam Yancha Janmdiwas 15th October Vachan Prerana Diwas Mhanun Sajara Karane Shasan Paripatrak) 


आज दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा दिनांक 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करणे बाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.


माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मृति जतन करण्याचे उद्देशाने दिनांक 15 ऑक्टोबर का त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निर्णयास अनुसरून संदर्भातील शासन परिपत्रक क्रमांक एक च्या अनुषंगाने वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम साजरा करण्यासाठी सर्व मंत्रालय विभाग व त्याच्या आधी पत्त्याखालील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय शासकीय संस्था मंडळ सार्वजनिक उपक्रम इत्यादी कार्यालयांनी देखील विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत दरवर्षी सूचना देण्यात येतात.

मराठी भाषेचा प्रचार व प्रसार हे मराठी भाषा विभागाचे मुख्य दोन आहे या धोरणाची व्यापकता वाढवण्यासाठी मराठी भाषे संदर्भात राबविण्यात येणाऱ्या विद्यमान व विस्तारित उपक्रमांना दिनांक 24 जून 2022 च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचन संस्कृती वरून निघत होण्यासाठी विविध प्रकारचे संदेश व्याख्याने चर्चासत्र अभिवाचन सामूहिक वाचन ग्रंथ प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमासाठी मराठी भाषा विभाग व अधिनिष्ठ कार्यालय यांना कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे सूचना देण्यात आले आहे विस्तारित उपक्रमांतर्गत मराठी प्रचार प्रसार साठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे सदर शासन निर्णयानुसार संबंधित आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे आहे.

तसेच सर्व मंत्रालयीन विभाग व त्याच्या अधिपथ्यकालीन सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय शासकीय संस्था मंडळ सार्वजनिक उपक्रम इत्यादी कार्यालयांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करावयाचे आहे.


1) सांस्कृतिक कार्यक्रम चर्चासत्रे प्रशिक्षण इत्यादी माध्यमातून दरवर्षी वाचन संस्कृती वाढीस लागण्यास विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा समाज माध्यमे प्रत्यक्षरीत्या ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने कार्यक्रम करण्यात यावे जेणेकरून कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून वाचन प्रेरणा दिनाचा संदेश सगळीकडे एकाच वेळी प्रसारित करता येईल. यावर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून अमृत महोत्सव भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव राष्ट्रीय भक्ती पर पुस्तकांच्या वाचनाचा ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करून राष्ट्रभक्तीपर पुस्तकांचे साहित्याचे वाचन राष्ट्रभक्तीपर पुस्तके भेट देणे देशाच्या स्वातंत्र्य चळवळी सहभाग घेतलेल्या थोर व्यक्तींना त्यांच्या कार्यावर पुस्तकांच्या अभिवाचनातून आदरांजली अर्पित करणे त्यांच्या चरित्रपर पुस्तकांचे प्रदर्शन वाचक मिळावी परिसंवाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी आपले मित्र कुटुंबातील सदस्य इत्यादींना किमान एक पुस्तक भेट देऊन प्रोत्साहन द्यावे.

ललित साहित्य या पुरते कार्यक्रम मर्यादित न ठेवता विज्ञान तंत्रज्ञान व्यवस्थापन पर्यावरण आरोग्य संगणक संकेतस्थळ अवकाश विज्ञान इत्यादी काळानुरूप विषयांचा देखील समावेश कार्यक्रमात करण्यात यावा.

वाचन संस्कृती वाढीस लागावी तसेच मराठी भाषेचा प्रचार प्रसार या उद्दिष्टांचा रोजगाराभिमुख उपक्रमातून जास्तीत जास्त तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी खालील विषयांवर तसेच अशा स्वरूपाच्या अन्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. अनुवाद लेखन, व्यावसायिक लेखन, पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया, ई बुक, स्व प्रकाशन, युनिकोडचा वापर, ऑनलाइन पुस्तक विक्री लेखक प्रकाशन करार, संहिता लेखन, विश्वकोशा बाबत माहिती कार्यशाळा, शॉर्ट फिल्म डॉक्युमेंटरी लेखन.

व्हाट्सअप इंटरनेट फेसबुक ट्विटर अशा प्रकारच्या सामाजिक प्रसार माध्यमातून वाचन संस्कृती होईल वाचनास प्रेरणा मिळेल असे संदेश प्रसारित करावेत.

मराठी वाचन संस्कृती जपण्यासाठी सर्व उपलब्ध माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करून मराठीतील साहित्य स्वयंस्फूर्तीने वाचकांना पाठवावे.

सर्व संस्थांनी सोशल मीडियावर मराठी वाचन कट्टा निर्मिती करावी.

सर्व संस्थांनी आपल्या स्तरावर मराठी आभासी प्रत्यक्ष साहित्य संमेलनाचे आयोजन करावे.

विकिपीडिया सारख्या मध्यम आवर मराठीत जास्तीत जास्त लेखन व्हावे याकरिता संबंधीच्या कार्यशाळा आयोजित करण्यात याव्या.

वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने मराठी प्रचार प्रसार वाचन संस्कृतीच्या विकासासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे.

मराठी अभिजात दर्जा बाबत सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी विविध प्रकारचे संदेश व्याख्याने चर्चासत्रे अभिवाचन सामूहिक वाचन ग्रंथ प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात यावे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र मराठी विकास संस्था भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ यांनी वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या वाचन संस्कृती विषयक कार्यशाळेचे वेळापत्रक जाहीर करून त्याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करावेत.

राज्य मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळ राज्य मराठी विकास संस्था भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ यांनी मराठी भाषेचा प्रचार प्रसार प्रभावीपणे कसा करता येईल या विषयावरील तज्ञांच्या कार्यशाळा आयोजित कराव्यात.

वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी मराठी भाषेच्या वापराबाबत जागरूकता निर्माण करण्याकरिता संबंधित कार्यालयीन संकेतस्थळे आकाशवाणी दूरदर्शन खाजगी वृत्तवाहिन्या एफ एम रेडिओ स्थानिक केबल नेटवर्क फेसबुक ट्विटर व्हाट्सअप इत्यादी प्रसार माध्यमातून याबाबतचे दृकश्राव्य संदेश प्रसारित करावेत.

मातृभाषेची महती आणि माहिती तसेच मातृभाषेचे व्यक्तिगत व सामाजिक जीवनातील स्थान आणि मातृभाषेचे मानसशास्त्रीय व शिक्षण शास्त्राच्या दृष्टीने महत्त्व या विषयांवर विचार मंथनात्मक कार्यक्रम आयोजित करावेत.

सकस साहित्याची नव्या माहितीची आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान ची मराठीतील पुस्तके वाचकापर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यभर कार्यक्रम आयोजित करावेत.

वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी तसेच न्याय व्यवहार शासन प्रशासन प्रसार माध्यमे केंद्र तथा राज्य शासनाची कार्यालय इतर अशासकीय कार्यालय इत्यादी ठिकाणी होणारा मराठी भाषेचा वापर याबाबत जागता वाढवण्यासाठी व्याख्याने चर्चासत्रे परिसंवाद कार्यशाळा सादरी करणे तसेच आधुनिक माध्यमांचा वापर करून कार्यक्रमाचे आयोजन करावेत.

आकाशवाणी दूरदर्शन वरून सादर करण्यात येत असलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या प्रायोजित कार्यक्रमांमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी मान्यवरांच्या मुलाखती परिसंवाद आयोजित करावे.

वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी मराठी भाषा साहित्यकोश वांग्मय या विषयांवर ऑनलाईन व्याख्याने चर्चासत्रे परिसंवाद कार्यशाळा यांचे आयोजन तसेच तज्ञ विचारवंत व साहित्यिकांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात यावे.

वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी विविध मार्गांनी स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या व्यक्ती संस्था यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव सत्कार करणे.

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 नुसार वर्जित प्रयोजने वगळता शासकीय कामकाज 100% मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे तर ती भाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अत्याधीतील सर्व कार्यालय सार्वजनिक उपक्रम यांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश संबंधितांच्या निदर्शनास आणावे.

भाषा संचालनालयाने व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेल्या भ्रमणध्वनी उपयोजकाबद्दल मोबाईल ॲप तसेच मराठी भाषा जगाच्या व त्या अंतर्गत कार्यालयांच्या संकेतस्थळाबद्दलची माहिती शाळा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांपर्यंत प्रसारित करण्याची जबाबदारी चारही क्षेत्रीय कार्यालयाची राहील.

वरील कार्यक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ राज्य मराठी विकास संस्था भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ यांनी खालील प्रमाणे साहित्य संस्थांची मदत घेऊन त्या साहित्य संस्थांसमोर दर्शवलेल्या जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मदत घ्यावी.

ग्रंथालय महाविद्यालय तंत्र महाविद्यालय पदविका संस्था तसेच अधिकारी अन्य संस्थांना वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने संबंधितांना द्याव्यात.

सांस्कृतिक व पर्यटन विभागांतर्गत सांस्कृतिक संचालनालयाच्या अखत्यारीतील संस्थांना उदाहरणार्थ फिल्म सिटी गोरेगाव अखिल भारतीय नाट्य महामंडळ अशा स्वरूपाच्या संस्थांना वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना सांस्कृतिक व पर्यटन विभागाने संबंधितांना द्याव्यात.

शालेय शिक्षण विभाग अंतर्गत शाळा या वाचन संस्कृती करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे माध्यम आहे ही बाब विचारात घेता वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने त्यांच्या अतत्यारीतील संबंधित संस्थांना वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना द्याव्यात.

अशा प्रकारच्या सर्व सूचना वाचण्यासाठी संपूर्ण शासन परिपत्रक आपण डाऊनलोड करून वाचू शकता.





संपूर्ण शासन परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.