आजचे बदली अपडेट - जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात आजचा ग्राम विकास विभागाचा शासन आदेश.
आज दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणाली द्वारे आंतरजिल्हा बदल्यांबाबत दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी आदेश निर्मिती झाल्याने प्रथम टप्पा पूर्ण झाला आहे सदर आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना दिनांक पाच सप्टेंबर 2022 पर्यंत कार्यमुक्त करण्याबाबत दिनांक 30 ऑगस्ट 2022 च्या पत्रा अन्वय सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यास अनुसरून जिल्हा अंतर जिल्हा बदली रुजू झालेल्या शिक्षकांना संबंधित जिल्हा परिषदांनी शासन निर्णयातील तरतुदीनुसार पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही आपल्या स्तरावरून सुरू असेलच.
आता जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणाली द्वारे जिल्ह्यांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सुरू करावयाची आहे त्याकरिता दिनांक 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सेवानिवृत्त अथवा निधन किंवा अन्य कोणत्या कारणाने रिक्त झालेली पदे त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर झालेल्या रिक्त जागा तसेच आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांच्या समायोजनानंतर उर्वरित रिक्त पदे संभाव्य रिक्त पदे याबाबतचा संपूर्ण तपशील ऑनलाईन बदली प्रणालीवर अद्यावत करण्यात यावा.
दिनांक 31 ऑगस्ट 2022 पर्यंतची रिक्त पदांची माहिती ऑनलाईन प्रणालीवर अद्यावत केल्यानंतर आंतरजिल्हा बदलीने रोजी झालेल्या शिक्षकांना पदस्थापना न देता जिल्ह्यांतर्गत बदल्याबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णयातील तरतुदीनुसार समायोजनाने पदस्थापना देण्याची कार्यवाही करण्यात यावी जेणेकरून एकाच जागेवर दोन शिक्षकांची नियुक्ती होणार नाही. त्यामुळे जिल्हा अंतर्गत बदली बाबतची कार्यवाही विना व्यत्यय पार पाडली जाईल याची दक्षता घ्यावी.
वरील प्रमाणे सूचना ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आजच्या पत्रानुसार दिल्या आहेत.
जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात आजचा ग्राम विकास विभागाचा शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments