बदली अपडेट - सोलापूर मधील अतिरिक्त विषय शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर पुढच्या आठवड्यात लगेच जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार - मा. आयुष प्रसाद बदली प्रक्रिया समिती प्रमुख

 बदली अपडेट - पुढील आठवड्यात जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार - मा. आयुष प्रसाद, बदली प्रक्रिया समिती प्रमुख. 


जिल्हा अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रिया संदर्भातील सर्व जिल्हा परिषदांची माहिती अद्यावत झालेली असून फक्त जिल्हा परिषद सोलापूर मधील अतिरिक्त विषय शिक्षक यांचे समायोजन होणे बाकी असल्यामुळे या आठवड्यात बदली प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही या संदर्भात बदली प्रक्रिया समितीचे अध्यक्ष व जिल्हा परिषद पुणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आयुष प्रसाद यांनी मावळ पुणे येथे शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी स्पष्टीकरण दिले. 


मा. आयुष प्रसाद साहेब शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी मावळ पुणे येथे आलेले आहेत. जिल्हाअंतर्गत बदली बाबत बोलताना त्यांनी असे सांगितले की फक्त सोलापूर जिल्ह्यातील  राहिलेला पदवीधर शिक्षकांच्या पदस्थापनेचा विषय पुढील दोन दिवसात मार्गी लागला की पुढच्या आठवड्यात बदली प्रक्रिया सुरू होईल.


यापुढे बोलताना ते म्हणाले की पुढील वर्षीपासून जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया कधी सुरू होईल किंवा केव्हा होईल हे विचारण्याचे काम राहणार नाही ज्याप्रमाणे आपण कॅलेंडरमध्ये एखादा सण कधी येईल हे निश्चित सांगू शकतो त्याचप्रमाणे दरवर्षी 15 मे पर्यंत जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया देखील पूर्ण होईल अशा पद्धतीची व्यवस्था आपण करून ठेवणार आहोत असे देखील त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. 


बदली प्रक्रिया समितीचे अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आयुष्य प्रसाद यांनी सदर प्रसंगी नेमके काय म्हटले ते व्हिडिओ स्वरूपात पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. 





नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.