अल्पसंख्यांक प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती अर्ज पडताळणी बाबत शिक्षण संचालक यांच्या महत्त्वपूर्ण सूचना.
(Alpasyankhak Pri Matric Scholarship Shishyavrutti Form Verification HM EO Important Instructions by Education Director)
शिक्षण संचालक योजना यांनी सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांना दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार धार्मिक अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जाची पडताळणी करणे बाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी माननीय पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार धार्मिक अल्पसंख्यांक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे ही योजना दिनांक 23 जुलै 2008 च्या शासन निर्णयानुसार सन 2008-09 पासून राज्यात राबविण्यात येत आहे ही शिष्यवृत्ती मुस्लिम ख्रिश्चन शीख पारशी बौद्ध व जैन या इयत्ता पहिली ते दहावीच्या धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी आहे.
सन 2015 16 पासून मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने एनपीएस 2.0 पोर्टल द्वारे घेण्यात येत आहे तसेच अर्जाची ऑनलाईन पद्धतीने पडताळणी दोन स्तरावरून करण्यात येते.
1) शाळा शाळेचे नोडल ऑफिसर (इन्स्टिट्यूट नोडल ऑफिसर)
2) जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक(डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर)
सन 2021 22 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये दहा लक्ष 86 हजार 183 अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी नऊ लक्ष 14,117 अर्जांची पडताळणी दोन्ही स्तरावरून पूर्ण करण्यात आली होती. पडताळणी केलेल्या नऊ लक्ष 14,117 अर्जांपैकी केंद्र शासनाने राज्यस्तरावर पुनर पडताळणीसाठी दहा हजार 793 अर्ज पाठवण्यात आले. त्यामधून 2816 अर्ज राज्यस्तरावरून फेक मार्क करण्यात आले म्हणजेच शाळा व जिल्हास्तरावरून पडताळणी पूर्ण केलेले व्हेरिफाय केलेले विद्यार्थ्यांपैकी 2816 अर्ज बनावट आढळलेले याचाच अर्थ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या अर्जाची पडताळणी शाळा व जिल्हा स्तरावरून काळजीपूर्वक केलेली नाही तसेच विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केलेली नाही असे दिसून येत. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी कर्तव्यामध्ये कसूर केलेली दिसून येते.
सन 2022 23 मध्ये पुढील प्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी.
शाळा स्तरावरून शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची पडताळणी विद्यार्थ्यांचे सर्व कागदपत्रे पाहून करावयाचे आहे व सर्व अर्ज व कागदपत्रे शाळा स्तरावर किमान पाच वर्ष जतन करून ठेवावीत.
जिल्हास्तरावर लिस्ट बेस्ट ऑन सिलेक्टेड क्रायटेरिया या रिपोर्टच्या आधारे शंकास्पद विद्यार्थी बाजूला काढून त्यातील काही विद्यार्थ्यांचे कागदपत्र शाळेकडून मागविण्यात यावे व त्यानुसार अर्जाची तपासणी करण्यात यावी.
बनावट अर्ज आढळल्यास फेक मार्क करावे.
शाळेचे नूडल ऑफिसर हे शाळेचे मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक यांनी नेमलेले नियमित कर्मचारी असावेत इतर असल्यास शाळेचे नूडल अधिकारी यांना फेक मार्क करण्यात यावे.
जिल्हा नूडल ऑफिसर हे फक्त शिक्षणाधिकारी माध्यमिक किंवा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी नेमलेले वर्ग दोन चे अधिकारीच असावेत या व्यतिरिक्त अन्न कर्मचारी अधिकारी आढळल्यास यांना तात्काळ बदलण्यात यावे.
विद्यार्थ्यांची बँक खाते क्रमांक हा विद्यार्थ्यांचा स्वतःचा किंवा पालकांचा असावा पालक म्हणजे विद्यार्थ्यांचे आई-वडील किंवा कायदेशीर पालक या व्यतिरिक्त इतर कोणाचेही बँक खाते क्रमांक चालणार नाही इतर आढळून आल्यास शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल.
सर्व जिल्ह्यांनी किमान दोन टक्के विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी प्रत्यक्षात कागदपत्रे पाहून करण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल व अभिप्राय संचालनलायास पाठवण्यात यावा.
वरील प्रमाणे सुस्पष्ट अशा सूचना अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती अर्ज पडताळणी करताना मुख्याध्यापक स्तरावरील नोडल ऑफिसर व शिक्षणाधिकारी स्तरावरील नोडल ऑफिसर यांना शिक्षण संचालक (योजना) मा. कृष्णकुमार पाटील यांनी सदर परिपत्रकामध्ये दिल्या आहेत.
वरील अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती अर्ज पडताळणी बाबत महत्त्वपूर्ण सूचनांचे परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments