राज्य प्रकल्प संचालकांचे मुख्याध्यापकांना पायाभूत भाषिक व गणितीय साक्षरता अभियानात सहभागी होणे बाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक

 राज्य प्रकल्प संचालकांचे मुख्याध्यापकांना पायाभूत भाषिक व गणितीय साक्षरता अभियानात सहभागी होणे बाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक.


समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई राज्य प्रकल्प संचालक यांनी दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्व यांना निपुण भारत अभियान अंतर्गत पायाभूत भाषिक व गणितीय साक्षरता अभियानात सहभागी होणे बाबत पुढील प्रमाणे पत्र लिहिले आहे.


शालेय शिक्षणाच्या सबलीकरणासाठी केंद्र शासनात द्वारा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व निपुण भारत अंतर्गत प्राथमिक स्तरावर सण २०२६२७ पर्यंत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यावर सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. वय वर्ष तीन ते नऊ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करत आहोत सदर कार्यक्रमात शासन ग्रामपंचायत समुदाय सहभाग स्थानिक पातळीवर कार्यरत सामाजिक संस्था व ग्रामस्थ या मुख्य घटकांच्या समन्वयांनी मुलांच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत करणे आवश्यक आहे.

आपल्याला माहीतच आहे की मागील दोन वर्षापासून करून सारख्या महामारीमुळे शाळा बंद होत्या यामुळे मुलांचे न भरून काढण्यासारखे शैक्षणिक नुकसान झाले आहे म्हणून आपण एप्रिल 2022 ते जून 2022 या महिन्यात शाळा पूर्वतयारी अभियान राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा व शासकीय शाळा मधून राबविले ज्यामध्ये आपण सर्व मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला व या अभियानाला समाजाच्या सर्व स्तरातून त्यामध्ये पालक शिक्षक लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता. आपल्या सर्वांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम खूप यशस्वी झाला तसेच या कामाचा मुलांच्या शारीरिक भावनिक बौद्धिक गुणवत्ता विकासात सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले आहे ही बाब आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे या कार्यक्रमाला आपण यशस्वी केले याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन व धन्यवाद तथापि हा मिळालेला सकारात्मक प्रतिसादाचा चांगला उपयोग मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी बाबा यासाठी आपण आता निपुण महाराष्ट्र अभियान सुरुवात 15 ऑगस्ट 2022 पासून निपुण प्रतिज्ञा घेऊन केली आहे परंतु यासाठी आपणास सतत प्रयत्न करत राहावे लागणार आहे व म्हणून आपण आपल्या गावासाठी यामध्ये योगदान द्यावे ही विनंती करण्यासाठी हा पत्र प्रपंच शाळा मुख्याध्यापक अंगणवाडी यांच्या माध्यमातून सकारात्मक कार्य करणे सुरू झाले आहे सदर कार्यात सरपंच शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून व समन्वयाने गाव समुदाय स्तरावर आता पुन्हा विशेष प्रयत्न करणे अपेक्षित आहेत. त्यासाठी आपल्या वाढीवस्ती मोहल्लानिहाय इयत्ता पहिली ते तिसरीच्या पालकांच्या मतांचे गट करणे व त्यांच्यामध्ये एक लीडर माता नियुक्त करून मुलांच्या शारीरिक सामाजिक भावनिक बौद्धिक भाषिक व गणन विकास करण्यास प्रकर्षाने भर देण्याचे कार्य करणे आवश्यक आहे त्यासाठी आपल्या स्तरावर विशेष प्रयत्न करणे व शाळेच्या सहभागाने आपल्या माध्यमातून केलेले गट नियमित चालतील यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.


माता गटांना मुलांसोबत शैक्षणिकृती घेण्यासाठी आठवडानिहाय अध्ययन साहित्य पुरविले जाईल व त्यांना सहकार्य करण्यासाठी उच्चशिक्षित युवक युवती यांचा स्वयंसेवक म्हणून निपुण मित्रांची नियुक्ती करण्यापेक्षा आहे सदर कार्य हे आपले नेतृत्वाने नक्कीच प्रेरणादायी ठरेल व आपल्या गावातील प्रत्येक मुलाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी माता गट स्वयंसेवक यांचा सहभाग या अभियानात करून घ्याल यासाठी प्रथम या संस्थेचे सहकार्य सुद्धा लाभले आहे.

चला तर मग एक संकल्प करूया निपुण भारत अंतर्गत प्रत्येक बालक माता आपले गाव आपला तालुका आपला महाराष्ट्र आपला देश हा निपुण बनवूया! 

या अभियानात आपले सहकार्य व सहभाग अपेक्षित आहे! 

वरील प्रमाणे आवाहन राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबई यांनी जिल्हा परिषद शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांना पत्र लिहून केले आहे.



 राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबई यांनी जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांना लिहिलेले पत्र पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.