शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डीजी लॉकर(DigiLocker) वापरावे - शिक्षण आयुक्त ( काय आहे डीजी लॉकर?)

 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डीजी लॉकर (DigiLocker) वापरावे - शिक्षण आयुक्त ( काय आहे डीजी लॉकर?) 


महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी 22 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी DigiLocker चा दैनंदिन वापर करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

आपण सर्व विविध तंत्रज्ञानाचा उपयोग दैनंदिन वापरामध्ये करत आहोत त्याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाने तयार केलेले विविध पैकी डीजी लॉकर DigiLocker हे एक ॲप आपणा सर्वांसाठी आपली वैयक्तिक कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी व जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तात्काळ उपलब्ध होण्यासाठी डिजिलॉकर या ॲपचा उपयोग महत्वपूर्ण ठरणार आहे डीजी लॉकर मध्ये डाउनलोड केलेली व अपलोड केलेली कागदपत्रे डिजिटल स्वरूपात असल्याने ते नेहमी आपल्या सोबतच असणार आहेत आवश्यकतेनुसार याचा वापर करता येईल.

या डीजी लॉकरमध्ये शासनाकडून ऑनलाइन सेवा उपलब्ध होत असलेली कागदपत्रे डाऊनलोड करून आपल्या डिजिलॉकर ॲपच्या खात्यामध्ये सेव्ह करण्याची तरतूद आहे या ॲपमध्ये एक जीबी क्षमतेपर्यंत डेटा स्टोअर करता येतो तसेच सदर डाऊनलोड केलेली कागदपत्र ही मूळ कागदपत्र समान असणार आहेत. तसेच या प्रमाणपत्राची मूळपत सोबत बाळगण्याची देखील आवश्यकता असणार नाही कारण या ऑनलाइन डाउनलोड केलेली कागदपत्र केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील तरतुदीनुसार मूळ कागदपत्राचा दर्जा प्राप्त आहे. उदाहरणार्थ पॅन कार्ड वाहन चालवण्याचा परवाना वाहन नोंदणी प्रमाणपत्र कोविडल्यास प्रमाणपत्र व विविध शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादी.

तसेच या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन प्रमाणपत्र शिवाय आपणास आवश्यक असणारी अन्य कागदपत्रे उदाहरणार्थ विविध प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे प्रशस्तीपत्रे वेतन प्रमाणपत्र शैक्षणिक कागदपत्रे इत्यादी देखील लॉकरमध्ये डॉक्युमेंट्स इन डिजि लोकर ड्राईव्ह वर विविध फोल्डरमध्ये अपलोड करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे यासाठी सध्या एक जीबी पर्यंत स्टोरेज करण्याची तरतूद आहे सदरची कागदपत्रे आपण आवश्यकता असेल तेव्हा ॲप मधून डाऊनलोड करून किंवा खुले करून योग्य त्यावेळी त्याचा सहज सुलभ वापर करता येणार आहे.

याबाबत आपणास कळविण्यात येते की सदर डीजी लॉकर ॲप पूर्णपणे मोफत असून दैनंदिन वापरात महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याने आपल्या अधिनस्त सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांच्या नियमित वापरातील मोबाईल मध्ये डाउनलोड इन्स्टॉल करून वापरण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात याव्यात व केलेली कार्यवाही या कार्यालयास अवगत करावी अशा सूचना माननीय शिक्षण आयुक्त यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई महानगरपालिका पश्चिम दक्षिण आणि उत्तर या सर्वांना दिल्या आहेत.

.

चला तर मग अशा अत्यंत उपयोगी एप्लीकेशन चा वापर करण्यासाठी खालील Download वर क्लिक करून ॲप डाऊनलोड करूया.

Download



माननीय शिक्षणायुक्तांचे डिजिलॉकर वापरणे संदर्भातील पत्र पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.