जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली बाबत आजचा ग्रामविकास विभागाचा आदेश.
आज दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांनी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाच्या बदली प्रक्रिया बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे तो पुढील प्रमाणे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलांसाठी दिनांक 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णय सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर जंगलातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत म्हणजेच बदली पात्र असलेल्या विशेष संवर्ग भाग एक मधील विशेष संवर्ग भाग दोन मधील शिक्षकांची यादी निवड वित्त पदांची यादी संभाव्यक्त पदांची यादी जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे इत्यादी गोष्टी वेळोवेळी शासन स्तरावरून निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच दिनांक सात ऑगस्ट 2021 च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या मुद्द्यांबाबतची स्पष्टीकरण संदर्भीय दिनांक 3 जून 2022 रोजीच्या पत्रांमुळे विन्सेस आयटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांना कळविण्यात आले आहेत.
बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित दरावयाची सेवा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालेली असेल असे शिक्षक अशी स्पष्ट तरतूद संदर्भीय शासन निर्णयातील व्याख्येतील अनुक्रमांक 1.7 मध्ये नमूद आहे त्यामुळे संदर्भीय दिनांक 3 जून 2022 च्या पत्रासोबतच्या स्पष्टीकरणात्मक मुद्द्यातील अनुक्रमांक आठ येथील मुद्द्याबाबतचे स्पष्टीकरण रद्द करण्यात येत आहे.
सबब शासन निर्णय दिनांक ७ एप्रिल 2021 मधील वरील तरतूद विचारात घेतात ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करावयाची सेवा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक झाली आहे मग अशी सेवा अवघड क्षेत्रातील एका किंवा अधिक शाळांमधील असली तरीही अशा शिक्षकांचा बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक संवर्गात समावेश करणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा शिक्षकांच्या बाबतीत बदल्यांबाबतच्या संगणक प्रणालीमध्ये एकापेक्षा अधिक क्षेत्रातील शाळेतील सेवा असल्यास ते यापूर्वी कार्यरत असलेल्या सर्वात अगोदरच्या अवघड क्षेत्रातील शाळेचा हजर झाल्याचा दिनांक हा अवघड क्षेत्रात रुजू दिनांक म्हणून नमूद करावा. जेणेकरून अशा शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करावयाची सेवा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त होत असेल असे शिक्षक शासन निर्णय यातील तरतुदीनुसार संगणक प्रणालीमध्ये बदलांची अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून अर्ज करू शकतील. तथापि संबंधित शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सलग सेवा असल्याची संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी खात्री करून तसे प्रमाणित करावे अशी विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना सदर शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे.
वरील शासन निर्णयातील महत्त्वपूर्ण बाब म्हणजे जरी दोन शाळेवर अवघड क्षेत्रात काम केले असले तरी देखील आजच्या या शासन निर्णयानुसार संवर्ग तीन म्हणजेच अवघड क्षेत्रात तीन वर्ष काम केल्यानंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षक असा लाभ सदर शिक्षकांना घेता येणार आहे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
2 Comments
ही अवघड ची अट फक्त त्यांच्यासाठी आहे का, जे आज अवघड मध्ये कार्यरत आहेत
ReplyDeleteYes
Delete