आता शाळा व्यवस्थापन समिती नेमणार जिल्हा परिषद शाळेत शिक्षक... शिक्षण अधिकाऱ्यांचे आदेश.

 आता शाळा व्यवस्थापन समिती नेमणार जिल्हा परिषद शाळेत शिक्षक... शिक्षण अधिकाऱ्यांचे आदेश.


दिनांक 28 जुलै 2022 रोजी जिल्हा परिषद भंडाराच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी निर्गमित केलेल्या पत्रानुसार जिल्हा परिषद शाळेत वर्ग एक ते आठ रिक्त असलेल्या सहाय्यक शिक्षक अथवा पदवीधर शिक्षक पदावर शाळा व्यवस्थापन समितीद्वारे तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक सत्र 2022-23 करिता मानधन तत्व तत्त्वावर शिकवण्यासाठी स्वयंसेवकांची व्यवस्था करण्याबाबत सांगितले आहे.

याला संदर्भ म्हणून जिल्हा परिषद शिक्षण व क्रीडा समितीची सभा दिनांक 13 जून 2022 चा ठराव आहे.

जिल्हा परिषद शिक्षण व क्रीडा समिती भंडारा सभा दिनांक 13 जून 2022 चा ठराव क्रमांक 10 /2 अन्वय शैक्षणिक सूत्र 2022 23 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक शाळेत वर्ग एक ते आठ साठी सहाय्यक शिक्षक किंवा पदवीधर शिक्षक यांची पदे संचमान्यता 2020 21 नुसार रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आवश्यकतेप्रमाणे रिक्त असलेल्या पदांवर तात्पुरत्या स्वरूपातील चार हजार रुपये प्रति महा मानधन तत्त्वावर शाळा व्यवस्थापन समितीद्वारे खालील विहित अटी व शर्तीच्या आधी राहून स्वयंसेवक नियुक्त करणे बाबत ठराव मंजूर करण्यात आला आहे.


स्वयंसेवक नेमणुक व नेमणूक रद्द करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला राहतील.

स्वयंसेवक हा शक्यतोवर स्थानिक उमेदवारातून निवडणूक यावा.

स्वयंसेवकांनी विहित शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता धारण केलेली असावी.

स्वयंसेविकास विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमाची संबंधित संपूर्ण कार्य करणे बंधनकारक राहील.


त्या अनुषंगाने याद्वारे सन 2022 23 करता संच मान्यतेनुसार रिक्त पदांवर शाळा व्यवस्थापन समिती द्वारे वरील विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्पुरते शैक्षणिक कार्यासाठी खालील प्रमाणे पंचायत समिती निमित्त स्वयंसेवक दिनांक एक ऑगस्ट २०२२ पासून पुढील तीन महिन्याकरता नियुक्त करण्यास परवानगी देण्यात येते याबाबतीत संबंधित रिक्त पदे असलेल्या शाळांना तात्पुरती शैक्षणिक कार्यासाठी स्वयंसेवक नियुक्त करण्याबाबत आपले स्तरावरून कळविण्यात यावे.

तसेच सोबत प्रतिज्ञापत्र देण्यात येत आहे सदरचे प्रतिज्ञापत्र स्वयंसेवक आपण शंभर रुपयाची स्टॅम्प पेपरवर लिहून दप्तरी जतन करून ठेवण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समिती सचिव तथा मुख्याध्यापक यांची राहील व सदर प्रतिज्ञा पत्राची एक प्रत पंचायत समिती मार्फत या कार्यालयास सादर करण्यात यावी.

तसेच नियुक्त केलेलं स्वयंसेवकांना माहे ऑक्टोबर 2022 पर्यंत पंचायत समिती निहाय लागणाऱ्या एकूण मानधन तरतुदीची माहिती विहित प्रपत्र तात्काळ या कार्यालयात सादर करावी जेणेकरून सदर तरतूद मंजूर करणे बाबतची कार्यवाही करणे सोयीचे होईल.

अशा सूचना भंडारा जिल्हा परिषद चे शिक्षणाधिकारी यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.




वरील संपूर्ण शिक्षणाधिकारी प्राथमिक भंडारा ची आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.


Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 



https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏





Post a Comment

2 Comments

  1. Sikavine he kahi airagabalache . Kam nvhe . Yasathi tn mn dhnane. Tyagmurti bnav lagata.

    ReplyDelete
    Replies
    1. फक्त शिक्षकांसाठी च हे लागू आहे का?

      Delete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.