शालेय विद्यार्थ्यांचे आधार कार्ड स्टुडन्ट पोर्टलवर अद्यावत करणे बाबत शिक्षण आयुक्तालयाचे परिपत्रक.
शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक एक ऑगस्ट 2022 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार शालेय विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अद्यावत करणे बाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.
राज्यातील सर्व विभागाच्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील इयत्ता पहिली ते बारावी मध्ये शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी करणे व अध्यायवतीकरण करणे काम पूर्ण करून संबंधित विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणाली मध्ये नोंदवून त्याची खात्री करणे आवश्यक आहे.
शासन निर्णयान व शालेय शिक्षण विभाग अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार शिक्षण हक्क अधिनियम अंतर्गत दुर्बल वंचित घटकांकरिता 25 टक्के प्रवेश प्रक्रिया तसेच वैयक्तिक लाभांच्या विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. विविध सवलती व वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यापर्यंत पारदर्शी पद्धतीने पोहोचवण्यासाठी विविध उपाय योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांना आधार क्रमांक अपडेट करणे बाबत करण्यात आले होते त्यास पुरेसा प्रतिसाद प्राप्त झाल्याची दिसत नाही किंबहुना तसा अहवाल या कार्यालयास प्राप्त नाही तसेच शालेय विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सरल पोर्टल वर नोंद करणे अपडेट करणे व्हेरिफाय करणे इत्यादी बाबत दिनांक 21 जून 2022 व दिनांक 29 जून 2022 रोजी राज्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी शिक्षण अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन सविस्तर सूचना दिल्या आहेत. तथापि अद्याप सदरची कामात काही प्रगती झाल्याची दिसून येत नाही.
सरल प्रणालीत स्टुडन्ट पोर्टलवर मुख्याध्यापक यांच्या लॉगिनवर रिपोर्ट मेनूतील आधार मिस मॅच या उपमेय ज्या विद्यार्थ्यांचे आधारमध्ये मिस मॅच आहे अशा विद्यार्थ्यांची आधार अपडेट व आधार प्रणालीत करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे तसेच आधार नोंद केलेल्या व आधार इन ब्रेड असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करण्याची सुविधा देखील देण्यात आलेली आहे. सदर आधार पडताळणीसाठी सरळ प्रणालीतील विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव जन्मतारीख लिंग ही माहिती व आधार कार्ड वरील विद्यार्थ्यांच्या माहितीशी जोडणे आवश्यक आहे ज्या विद्यार्थ्यांची माहिती जुळेल अशा विद्यार्थ्यांचा डाटा आधार कडून व्हॅलिडीट होऊन फ्रीज होणार आहे.
याप्रमाणे शाळांतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीत ऑनलाईन पद्धतीने अपडेट करण्यात यावेत.
तरी शासन निर्णयामध्ये नमूद बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य ते नियोजन करून राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंद करून वेरिफाय होतील या दृष्टीने आपल्या विभागातील कार्यवाही पूर्ण करावी व केलेली कार्यवाही वेळोवेळी या कार्यालयास व शासनास अवगत करावी.
वडील प्रमाणे निर्देश माननीय शिक्षण आयुक्त यांनी शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक सर्व जिल्हे तसेच शिक्षण निरीक्षक मुंबई महानगरपालिका पश्चिम, दक्षिण व उत्तर यांना दिले आहेत.
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments