सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग म्हणजेच समाज कल्याण विभागाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती दर आणि आवश्यक कागदपत्रे.
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत पुढील प्रमाणे शिष्यवृत्ती दिल्या जातात. व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
1) अनुसूचित जातीतील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती रुपये 2250.
@ विहित नमुन्यातील माहिती मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी व शिक्यासह.
@ गुणपत्रिका.
@ विद्यार्थ्यांचा स्वतःचा जातीचा दाखला (पालकाच्या जातीचा दाखला चालत नाही)
@ पालकाचा उत्पन्नाचा दाखला.
@ विद्यार्थ्याच्या बँक पासबुकची झेरॉक्स बँक अकाउंट हे आधार संलग्नित केलेले असावे( पालकाची बँक खाते क्रमांक चालत नाही)
प्रस्तावासाठी एक्सेल शीट डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
2) अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती रुपये 3000.
@ विहित नमुन्यातील माहिती मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी व शिक्यासह.
@ गुणपत्रिका.
@ विद्यार्थ्यांचा स्वतःचा जातीचा दाखला (पालकाच्या जातीचा दाखला चालत नाही)
@ विद्यार्थ्यांच्या पालकाची 20 रुपयाची कोर्ट फीस टाईम लावून असच व्यवसाय काम करीत असल्याचे हमीपत्र.
@ पालक अस्वच्छ व्यवसायात काम करीत असल्याबाबतचे ग्रामसेवक किंवा नगरपालिका मुख्याधिकारी यांचे प्रमाणपत्र.
@ विद्यार्थ्यांच्या बँक पासबुकची झेरॉक्स बँक अकाउंट आधार संलग्नित केलेले असावे.
3) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी ते सातवी रुपये 600 प्रमाणे इयत्ता आठवी ते दहावी 1000 रुपये प्रमाणे.
@ विहित नमुन्यातील माहिती मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी व शिक्यासह.
@ विद्यार्थ्याच्या बँक पासबुकची झेरॉक्स बँक अकाउंट हे आधार संलग्नित केलेले असावे( पालकाची बँक खाते क्रमांक चालत नाही)
प्रस्तावासाठी एक्सेल शीट डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
4) मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती अनुसूचित जाती इयत्ता पाचवी ते सातवी रुपये 500 व इयत्ता आठवी ते दहावी रुपये 1000 विजा भज विमाप्र विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी ते सातवी दोनशे रुपये व इयत्ता आठवी ते दहावी चारशे रुपये.
@ विहित नमुन्यातील माहिती मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी व शिक्यासह.
@ गुणपत्रिका.
प्रस्ताव तयार करण्यासाठी एक्सेल शीट डाउनलोड करणे यासाठी खाली Download वर क्लिक करा
5) इयत्ता पहिली ते दहावीच्या विजा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती इयत्ता पहिली ते आठवीसाठी हजार रुपये इयत्ता नववी व दहावी साठी रुपये 1500.
@ विहित नमुन्यातील माहिती मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी व शिक्यासह.
@ गुणपत्रिका.
@ विद्यार्थ्यांचा स्वतःचा जातीचा दाखला (पालकाच्या जातीचा दाखला चालत नाही)
@ पालकाच्या उत्पन्नाचा दाखला उत्पन्न मर्यादा दोन लक्ष रुपये.
@ विद्यार्थ्यांच्या बँक पासबुकची झेरॉक्स बँक अकाउंट आधार संलग्नित केलेले असावे.
6) इयत्ता पहिली ते दहावीच्या विमा व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती इयत्ता पहिली ते दहावी रुपये 1500 प्रमाणे.
@ विहित नमुन्यातील माहिती मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी व शिक्यासह.
@ गुणपत्रिका.
@ विद्यार्थ्यांचा स्वतःचा जातीचा दाखला (पालकाच्या जातीचा दाखला चालत नाही)
@ पालकाच्या उत्पन्नाचा दाखला उत्पन्न मर्यादा दोन लक्ष रुपये.
@ विद्यार्थ्यांच्या बँक पासबुकची झेरॉक्स बँक अकाउंट आधार संलग्नित केलेले असावे.
7) इयत्ता दहावीच्या अनुसूचित जाती विजाभज व विमा प्र विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा फी रुपये 395 प्रमाणे.
@विहित नमुन्यात प्रस्ताव
वरील माहिती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments