प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये पालक शिक्षक संघ स्थापन करणे बाबत मार्गदर्शक तत्वे - शासन निर्णय
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक 22 मे 2000 रोजी प्राथमिक माध्यमिक शाळेत पालक शिक्षक संघाची स्थापना करणे बाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या भौतिक शैक्षणिक विद्यार्थी विकासाच्या संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी शालेय कामकाजामध्ये प्रत्येक पालकाचा सक्रिय सहभाग व सहयोग वाढवण्यासाठी शासन निर्णय दिनांक 16 मे 2096 प्रत्येक मान्यता प्राप्त शाळेत पालक शिक्षक संघाची स्थापना करणे अनिवार्य आहे. माध्यमिक शाळा संहितातील नियम क्रमांक 3.2 मध्ये त्यानुसार तरतूद करण्यात आली असून हे आदेश 1996-97 च्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात आले आहे.
पालक शिक्षक संघाची स्थापना रचना सुरू कर्तव्य व शालेय कामकाजामध्ये स्थान ठरविण्यासाठी शिक्षण संचालकाच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली होती त्यात विविध व्यक्तींचा समावेश होता त्या समितीने केलेल्या सूचना शिफारसी विचारात घेऊन पालक शिक्षक संघाची रचना कर्तव्य याबाबत शासन निर्णय दिनांक 18 ऑक्टोबर 2017 अन्वय सूचना दिले आहेत.
पालक शिक्षक संघाच्या संदर्भात फोरम फोर फेअरनेस इन एज्युकेशन यांनी दाखल केलेल्या याचिका क्रमांक 2298 माननीय उच्च न्यायालय यांनी मार्गदर्शक तत्वे लागू करण्याबाबत दिनांक एक फेब्रुवारी 1999 पुढील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहे.
वरील शासनाच्या अंमलबजावणी काही शाळांमध्ये काटेकोरपणे केली जात नसल्याच्या तक्रारी शासनाकडे आलेल्या आहेत. याकरिता याबाबत शासनाने आतापर्यंत दिलेल्या वरील सर्व शासन आदेशाकडे सर्व संबंधितांचे पुन्हा लक्ष वेधण्यात येत आहे व शासन निर्णय दिनांक 18 ऑक्टोबर 1997 व शासन परिपत्रक दिनांक 9 एप्रिल 1999 अधिक्रमित करून या संबंधित पुढील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत.
1) शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक संघटनेची सभासद असतील.
2) शहरी भागात रुपये पाच व ग्रामीण भागात रुपये एक दराने संघटनेच्या प्रत्येक सभासदाकडून दरवर्षी शिक्षण शुल्क घेण्यात यावे.
3) राज्यातील मान्यता प्राप्त अनुदानित क्रीना अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळेची शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून 30 दिवसाच्या आत पालक शिक्षक संघाची स्थापना करावी.
4) पालक शिक्षक संघाची स्थापना झाल्यानंतर पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची निवड लोकशाही पद्धतीने दोन आठवडे करण्यात यावी त्यासाठी घ्यावयाच्या बैठकीची सूचना सर्व संबंधितांना पत्रकाद्वारे एका आठवड्या अगोदर देण्यात यावी.
5) शिक्षण अधिकारी शिक्षण निरीक्षक हे प्रत्येक पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची निवड लोकशाही पद्धतीने होईल याची खात्री करतील.
6) पालक शिक्षक संघाचे कार्यकारी समितीची रचना पुढील प्रमाणे आहे.
अध्यक्ष - प्राचार्य किंवा मुख्याध्यापक
उपाध्यक्ष - पालकांमधून एक
सचिव - शिक्षकांमधून एक
सहसचिव दोन - पालकांमधून एक व विद्यार्थ्यांमधून एक
सदस्य - पालकांमधून एक
प्रत्येक तुकडीसाठी एक शिक्षक, प्रत्येक तुकडीसाठी एक पालक जेवढ्या तुकड्या तेवढे पालक सदस्य.
7) पालक सदस्यांमध्ये किमान एक मागासवर्गीय बाल असावा तसेच 50% महिला सदस्य असाव्यात.
8) पालक शिक्षक संघाच्या प्रतिनिधींच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांची नावांची यादी शाळेच्या सूचनाफलकावर प्रदर्शित करावी.
9) सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांनी पालक शिक्षक संघाची स्थापना केल्यानंतर 15 दिवसाच्या आत सभासदांच्या नावांची यादी व कार्यकारी समितीच्या सदस्यांची यादी संबंधित शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक यांच्याकडे सादर करावी.
10)पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीची मुदत एक वर्ष राहील कोणत्याही पालकास अथवा शिक्षकास एकदा सदस्य झाल्यानंतर त्यानंतर पाच वर्षात पदाधिकारी होता येणार नाही.
11)कार्यकारी समितीची बैठक महिन्यातून एकदा घेण्यात यावी.
12) सर्व बैठकांची सूचना परिपत्रकाद्वारे विषय पत्रिकेसह सर्व सदस्यांना आगाऊ पाठवावी.
13) बैठकीचे स्वाक्षरीत इतिवृत्त नोंदवहीत ठेवून ती नोंदवही जतन करून ठेवावी.
14) शाळांना या उपक्रम संबंधीच्या सूचनांसाठी एक स्वतंत्र सूचनापेटी उपलब्ध करून द्यावी व ती शाळेत पालकांच्या दृष्टीक्षेपात येईल अशा भागात लावावी.
15) पालक शिक्षक संघाबाबतची सर्व परिपत्रके शासन निर्णय उच्च न्यायालयाचे निर्णय सूचना इत्यादी सर्व कागदपत्रे फलकावर प्रदर्शित करावी.
16) पालक शिक्षक संघाची कर्तव्य खालील प्रमाणे असतील.
नियोजनाप्रमाणे अभ्यास क्रम पूर्ण होईल हे पाहणे.
अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य त्या उपाययोजना सुचवणे.
अभ्यासाची पूरक असलेल्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात शाळांना सहाय्य करणे.
सहशालेय उपक्रमांना मान्यता देणे.
विनाअनुदानित शाळेतील शिक्षण शुल्क सत्र फी व सहशालेय उपक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्क संबंधित माहिती घेऊन नोंद घेणे.
18 पालक शिक्षक संघाचा मूळ उद्देश विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्या सोडवणे हा आहे पालक शिक्षक संघाने दैनंदिन कामकाज प्रशासन यात लक्ष घालणे अपेक्षित नाही.
हे आदेश निर्ग्वित होण्याच्या दिनांकापूर्वी शिक्षक पालक संघाबाबत केलेली कार्यवाही ही शासन निर्णय दिनांक 18 ऑक्टोबर 1997 व शासन निर्णय दिनांक 9 एप्रिल 1999 नुसार करण्यात आल्याचे समजण्यात येईल.
पालक शिक्षक संघाची स्थापना करण्याबाबत माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शासनाने आवश्यक ते सर्व आदेश दिलेले आहेत शासन आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे न केल्यास संबंधित शाळेच्या व्यवस्थापनास जबाबदार धरण्यात येईल आणि त्याविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात येईल याची सर्व संबंधितांना जाणीव करून देण्यात यावी.
वरील प्रमाणे निर्देश शिक्षक पालक संघ याबाबत शासनाने दिलेले आहेत.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments